Heart Breakup : ‘व्हॅलेंनटाईन्स डे’ च्या महिन्यात सेलिब्रेट होणार हार्टब्रेक | पुढारी

Heart Breakup : 'व्हॅलेंनटाईन्स डे' च्या महिन्यात सेलिब्रेट होणार हार्टब्रेक

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

“प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं” या झाल्‍या कवितेच्‍या ओळी; पण खरंच सगळ्यांचं प्रेम सेम असतं का? जर प्रेम सेम असेल तर; ब्रेकअप (Heart Breakup)पण सेम असतं का? मनापासून जोडलेलं नातं जेव्हा तुटतं किंवा ब्रेकअप होतं तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल… ती व्यक्ती मनाने किती खचून गेली असेल. असंच काहीसं झालंय अभिनेता विनय प्रतापराव देशमुख याच्यासोबत आणि म्हणूनच तो बोलतोय “चांगली खेळलीस तू… भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू…!”

Heart Breakup : विनय प्रतापराव देशमुख आणि  रुचिरा जाधव

‘किस्सा घर प्रॉडक्शन्स’, ‘मिडीया वर्क्स स्टुडियो’ यांच्या सहकार्याने प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत, विनय प्रतापराव देशमुख आणि  रुचिरा जाधव या जोडीचं #BreakUpAnthemOfTheYear ‘चांगली खेळलीस तू’. मयंक पुष्पम सिंह निर्मित हे मराठी ब्रेकअप रॅप साँग नुकतेच पुणे येथे लाँच करण्यात आले. श्री.विवेक मुगळीकर,  श्री.हरीश माने आणि श्री.अजय नाईक यांच्या हस्ते हे गाणं प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी गाण्यातील प्रमुख कलाकार विनय प्रतापराव देशमुख, रुचिरा जाधव, रॅपर सर्जा, ‘मीडियावर्क्स स्टुडिओ’चे डायरेक्टर श्री. सुजित शिंदे , पार्श्वगायक तसेच ‘मीडियावर्क्स स्टुडिओ’चे डायरेक्टर मंगेश बोरगावकर, ‘मीडियावर्क्स स्टुडिओ’चे फाउंडर डायरेक्टर आदित्य विकासराव देशमुख, ‘रिफिल’चे डायरेक्टर सुरेश तळेकर आणि सुनील चांदुरकर उपस्थित होते.

चांगली खेळलीस तू

गेले दोन वर्ष लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे मनोरंजन क्षेत्राशी निगडीत गोष्टींना जरा ब्रेक लागला होता. लॉकडाऊनच्या पूर्वी सिनेमा, संगीत यांचा प्रकाशनसोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला जायचा. सुरक्षिततेच्या दृष्टिने नंतर प्रोजेक्ट डिजीटली लाँच केले गेले; पण आता सर्वकाही सुरळित होण्याच्या मार्गावर आहे या आनंदाने ‘चांगली खेळलीस तू’ हे मराठी ब्रेकअप रॅप साँग  लाँच करण्यात आले.

अभिनयासह विनय प्रतापराव देशमुखचे याचे दिग्दर्शनही

गाण्याचा हिरो आणि हिरोईन यांच्यातील सीन्स, रॅप साँगचे शब्द, एकंदरीत संपूर्ण गाणं पाहता ते प्रेक्षकांना नक्की आवडेल.  दुःख आलं की ते कुरवाळत बसायचं की, त्यातून स्वतःला घडवायचं हे तुम्हाला या गाण्याचा शेवट पाहिल्यावर कळेल. या गाण्यात प्रेक्षकांसाठी एक सुंदर, गोड सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज म्हणजे अभिनेत्री सायली संजीव. सायली संजीव या गाण्यात ‘सायली संजीव’च्याच भूमिकेत दिसणार आहे. आता गाण्यात सायलीची एन्ट्री नेमकी कशी होते हा एक ट्विस्ट आहे. ते गाणं पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल.  या गाण्यात सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीवर देखील नजर टाकण्यात आली आहे. जी खरंतर वस्तुस्थिती आहे आणि ती व्यक्ती आहे आपली आई. ब्रेकअप झाल्यावर आईचं महत्त्व समजतं, तिच्या कुशीत जाऊन मनमोकळं रडावंसं वाटतं, आईसाठीच्या भावना या गाण्यात दाखवल्या आहेत. अभिनयासह विनय प्रतापराव देशमुख याने या गाण्याचं दिग्दर्शन देखील केले आहे. हे रॅप साँग रॅपर सर्जा याने गायले असून या गाण्याचे शब्द ही त्यानेच लिहिले आहेत. शांप्रद भम्रे यांनी गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. सुमेध कंकाळ हे गाण्याचे असोशिएट डायरेक्टर आहेत तर निखिल गुल्हाने हे डिओपी आहेत. हे गाणं तुम्हाला ‘रिफील मराठी’ या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

पाहा व्हिडीओ : Changli Khelalis Tu [Official]

Back to top button