Hrithik Roshan : ऋतिक रोशन मिस्ट्री गर्लसोबत पुन्हा डिनर डेटवर

Hrithik Roshan : ऋतिक रोशन मिस्ट्री गर्लसोबत पुन्हा डिनर डेटवर

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. हृतिक आणि मिस्ट्री गर्ल सबा आझादसोबतच्या डिनर डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. सबा २०११ मध्ये रोमँटिक कॉमेडी 'मुझसे फ्रेंडशिप करोगे' चित्रपटामध्ये दिसली होती. हृतिक मिस्ट्री गर्ल सबासोबत पुन्हा एकदा टाईम्स पेंन्ड करताना दिसला. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिक आणि सबा नुकतेच दोघेजण एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले आहेत. यावेळी सबा हृतिकच्या मागे- मागे चालत होती. रेस्टॉरंटच्या दरवाज्याजवळ येताच हृतिकने आपला हात सबाच्या हातात दिला आणि दोघेजण गाडीकडे येताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यातील व्हिडिओतील खास म्हणजे, सबाने केसांच्या मदतीने आपला चेहरा लपवल्याचे दिसत आहे. यात हृतिक मात्र स्पष्ट दिसत आहे.

या डिनर डेटवेळी हृतिकने (Hrithik Roshan) पांढरा आणि ब्लू रंगाच्या शर्टसोबत खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तर सबाने यावेळी पिवळ्या रंगाच्या शार्टसोबत ब्लू रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. यावेळी दोघेही खूपच आनंदीत आणि ग्लॅमरस दिसत आहेत. याआधीही हृतिक आणि सबा एका डिनर डेटवेळी एकत्रित स्पॉट झाले होते. यामुळे चाहत्यांनी दोघांच्यात अफेअर असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावत कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'नवीन कपल्स' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने 'सही है…enjoy and god bless❤️'. असे लिहिले आहे. तर आणखी एका युजर्सने 'दोघाच्यात अफेअर सुरू आहे काय?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्हिडिओवरून हृतिक आणि सबाच्या अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं आहे.

तसेच एका वृत्तसंस्थेने हृतिकने सबासोबतचे नाते काही महिन्यांपासून लपविले असल्याची माहिती दिली आहे. तर एका सुत्राच्या माहितीनुसार, हृतिक आणि सबा एकत्रित गोव्यात सुट्ट्याचा आनंद घेत असून त्याची खास मैत्री असल्याची माहिती मिळत आहे.

कोण आहे सबा आझाद

हृतिकसोबत स्पॉट झालेल्या मिस्ट्री गर्लचं नाव सबा आझाद असे आहे. सबा एक चांगली अभिनेत्रीसोबतच संगीतकार आणि गीतकार आहे. ३२ वर्षीय सबाने २००८ मध्ये 'दिल कबड्डी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. त्यानंतर तिने २०११ मध्ये 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

सबा आतापर्यंत ५ चित्रपटांत दिसली आहे. सबा शेवटची 'फील्स लाइक इश्क' या चित्रपटात दिसली होती. याशिवाय सबा सफदर हाश्मी यांची भाची आहे. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे ८१.७ हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय सबा दिग्दर्शक इशान नायरच्या Guroor या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती.

हेही वाचलंत का? 

(video: viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news