पुण्यातील सर्व शाळा सोमवारपासून पुर्णवेळ सुरू राहणार : अजित पवार

पुण्यातील सर्व शाळा सोमवारपासून पुर्णवेळ सुरू राहणार : अजित पवार
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर काही अटींवर पुन्हा शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली होती. मात्र आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शाळा व महाविद्यालये पुर्णवेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

या पार्श्वभुमीवर सोमवारपासून पुणे येथील सर्व शाळा पुर्णवेळ सुरू राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच ज्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून २५ टक्के उपस्थितीत शालेय स्पर्धांसाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार म्हणाले…

  • जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा नाही, शंका असल्यास पुरावे द्यावेत; सिद्ध झाल्यास कारवाई करू
  • येरवड्यातील एका बांधकाम साईटवर घडलेली दुर्घटना गंभीर असून, त्यामध्ये मरण पावलेल्या कामगारांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचाराचाही खर्च केला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडून या घटनेची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने मागवला आहे. याप्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नसल्याची माहिती पवार यांनी दिली.
  • बाहेरच्या देशासह भारतातही कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. शिवाय लसीकरणही वेगाने केले जात आहे.
  • १५ ते १८ वयोगटात मुलांचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • २८ फेब्रुवारीपर्यंत रूग्ण संख्येचा अंदाज घेवून मार्च मध्ये जम्बो हॉस्पिटल बंद करण्याबाबत चर्चा झाली आहे. कारण ते बंद असले तरी त्याचे भाडे भरावे लागते.
  • सध्या पुण्यात कोरोना दर कमी नाही. त्यामुळं अजून एक दोन आठवडे पाहून काही निर्णय घेऊ. काही शिथिलता देण्यात आल्या आहेत.
  • विरोधकांनी कुठल्याही गोष्टीला नको तेवढे महत्व देऊ नये, माध्यमांत त्यावर चर्चा होतात.


हेही वाचा

व्हिडिओ पहा – मी नथुरामच्या व्यक्तिरेखेचं समर्थन करत नाही | Dr.Amol Kolhe on Why I Killed Gandhi | Nathuram Godse

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news