सांगली : विसापूरमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात पडून मृत्यू

सांगली : विसापूरमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात पडून मृत्यू

तासगाव, पुढारी वृत्तसेवा

विसापूर (ता. तासगाव) येथे शेततळ्यात पडलेल्या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या कमल आनंद जाधव (वय ६५) या महिलेचा शेतळ्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलीस पाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसात वर्दी दाखल केली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील कमल जाधव ह्या शेळ्या चरण्यासाठी खानापूर रस्त्यावरील कुंभार टेक परिसरात गेल्या होत्या. या ठिकाणी शिवाजी माने यांचे शेततळे आहे. या शेततळ्यात त्यापैकी एक शेळी पाणी पिण्यासाठी गेली असता शेळी पाय घसरून पाण्यात पडली. त्या शेळीला वाचवण्याचा जाधव प्रयत्न करत असतानाच त्यांचा तोल गेल्यानं त्या शेततळ्यात पाय घसरून पडल्या. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. याची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल ए. पी. ठाकरे व पोलीस कॉन्स्टेबल दत्ता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जाधव यांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा

व्हिडिओ पहा – सांगलीच्या मॅकॅनिकचा जुगाड! भंगारातून ३० हजारांत बनवली 'फोर्ड कार'

https://youtu.be/vlPdr8tWrUo

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news