पिंपरी चिंचवड; पुढारी वृत्तसेवा : महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन पोपट चिंचवडे (वय ५२) यांचे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास निधन झाले. त्याच्या मागे पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे. (Gajanan chinchwade)
चिंचवडगाव येथील अत्यंत होतकरू कार्यकर्ते, अत्यंत मनमिळावू स्वभाव, सर्वांशी दांडगा संपर्क असलेल्या गजानन चिंचवड यांच्या अचानक जाण्याची खबर येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सुरवातीला प्रा. रामकृष्ण मोरे सर यांच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरु केला. (Gajanan chinchwade)
पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. खासदार श्रीरंग बारणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.