पुढारी ऑनलाईन; बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीच्या ( norafatehi ) चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकतेच नोराचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक झाले आहे. दरम्यान, नोराने तिचे अकाऊंट डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पण अद्याप याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. तसेच तांत्रिक बिघाडामुळे नोराचं अकाउंट हॅक झाले असल्याचे बोलले जात आहे.
नोराचे चाहते तिचे फोटो पोहण्यासाठी तिच्या इन्स्टाग्राम अंकाउटवर गेले असता त्यांना तिचे फोटो दिसले नाहीत. यामुळे चाहत्यांच्यात सभ्रंम पसरला. यावेळी चाहत्याना 'कंटेंट अनुपलब्ध' लिहिलेली पोस्ट दिसत होती. यामुळे चाहत्यांना नोराने तिचे अकाऊंट का डिलीट केले आहे? असा प्रश्न पडला होता. परंतु, अल्पावधीतच तिचे इंन्स्टाग्राम वरील फोटो पुन्हा पाहण्यास मिळाले. यामुळे चाहत्यांनी तांत्रिक बिघाडामुळे नोराचे अकाउंट हॅक झाले असेल असा तर्क लावला आहे.
याच दरम्यान नोराने इन्स्टाग्रामवर पुनरागमन करून अकाउंट हॅक झाल्याबद्दलचा खुलासा केला आहे. यात तिने चाहत्यांची माफी मागत नोराने लिहिले आहे की, 'माफ करा मित्रांनो! माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. सकाळपासून कोणीतरी माझ्या खात्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. या समस्येचे त्वरित निराकरण करण्यात मला मदत करणाऱ्या इन्स्टाग्राम टीमचे आभार. यानंतर माझे अकाउंट परत सुरू झाले आहे.'
नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर ३७.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटोज शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.
अकाउंट हॅक होण्याआधी नोराने दुबईतून एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने व्हेकेशनचे व्हाइट लायन्ससोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. याशिवाय नोरा यातील एका व्हिडिओमध्ये नोरा भूक लागलेल्या सिंहांना खायला घालताना दिसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नोराने लिहिले की, Its that Lion energy from now on? …they so beautiful tho ??.'
नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अलीकडेच गायक गुरू रंधावाच्या 'डान्स मेरी रानी' या गाण्यात दिसली. या गाण्याचा अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोराचे या गाण्यातील डान्स स्टेप्स चाहत्यांना खूपच आवडल्या. या गाण्यात गुरू आणि नोरा यांची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळाली. हे गाणे रश्मी विराग यांनी लिहिले असून तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे शूटिग गोव्यात करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?