सर्वात मोठा ऑक्सिजन टँक नागपुरात? १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता

सर्वात मोठा ऑक्सिजन टँक नागपुरात? १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता

नागपुरात एक भला मोठा जम्बो ऑक्सिजन टँक दाखल झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टँक नागपूरात दाखल झाला आहे. हा स्टोरेज टँक मनोरुग्णालयाच्या परिसरात बसवण्यात येणार आहे.

हा टँक सध्या अमरावती रोड, गोंडखैरी येथे नागपूरच्या वेशीवर आहे. रात्री उशिरापर्यंत नागपुरात हा टँक दाखल होणार आहे. हा टँक १३ जुलै रोजी चेन्नईवरून निघाला आणि आज नागपूरच्या सीमेवर दाखल झाला. ५८ चाके असलेल्या कंटेनरमधून हा टँक नागपुरात आणण्यात आला. ९ दिवसांचा प्रवास करत नागपुरात पोहचला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते, त्यातून प्रशासनाने धडा घेत ही व्यवस्था केली आहे. याचा फायदा नागपूरच नव्हे तर विदर्भालासुद्धा होणार आहे. हा जम्बो टँक २० मीटर उंच तर ४० टन वजन असलेला देशातील सर्वात मोठा स्टोरेज टँक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कढीपत्त्याने कशी दिली शेतकऱ्याला सुबत्तेची फोडणी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news