Vikram Gokhale : भिकार मालिका पाहणे बंद करा : विक्रम गोखलेंचा चाहत्‍यांना सल्‍ला | पुढारी

Vikram Gokhale : भिकार मालिका पाहणे बंद करा : विक्रम गोखलेंचा चाहत्‍यांना सल्‍ला

पुढारी ऑनलाईन: दिवसेंदिवस छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका चाहत्यांच्या भेटीस येत असतात. यातील काही मालिका चाहत्यांच्या ज्ञानात भर घालत असतात. तर काही मालिका फालतू असतात. यामुळे चांगल्या मालिकेसोबत चाहत्यांना सर्वच मालिका पाहाव्या लागतात. आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांनी चाहत्यांना हात जोडून विनंती करत भिकार मालिका पाहण्यास बंद करण्याचा सल्ला दिला आहे.

नुकतेच विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी कल्याणामध्‍ये प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात चाहत्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डिजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढत आहे. पैसे मिळविण्यासाठी चाहत्यांना काहीही मालिकेत दाखविले जाते, असेही त्यांनी सांगितले.

स्वत: चा चॉईस तपासून पाहा, निश्चित करा, त्याच्यावर बंधने घाला आणि भिकार मालिका पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, तुम्ही भिकार मालिका पाहणे बंद केल्यावर दिग्दर्शक नक्कीच अशा मालिका बंद करतील. आणि चांगल्या मालिकेच्या मागे लागतील असेही विक्रम गोखले यांनी सांगितले.चाहत्यांनी अंतर्मुख करणारे चित्रपट, नाटक आणि मालिका नक्की पाहा, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

कोणताही अर्थ नसलेल्या मालिका ‘घाल पाणी, घाल पीठ’ या न्यायाने चाहत्यांच्या माथी मारल्या जात असल्याची खंतj[ त्यांनी व्यक्त केली. याशिवाय विक्रम गोखले यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म वैकुंठ याचे कौतुक केलं.

हेही वाचलंत का?

Back to top button