मुलांना जन्म द्या आणि साडे अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! ‘या’ कंपनीची मोठी ऑफर | पुढारी

मुलांना जन्म द्या आणि साडे अकरा लाखांच्या बोनससह एका वर्षाची सुट्टी मिळवा! 'या' कंपनीची मोठी ऑफर

पुढारी ऑनलाईन: आपल्या भारतात वाढती लोकसंख्या हा काही दिवसांपासून चिंतेचा विषय बनला आहे, मात्र, दुसरीकडे लोकसंख्येच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांकावर असणारा आपला शेजारी चीन आता मुलं जन्माला घालण्यासाठी देशातील नागरिकांना ऑफर देत आहे. चीनच्या या नव्या योजनेनुसार नागरिकांना तीन अपत्य जन्माला घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा चीनची लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

parliament budget session : सबका साथ, सबका विकास हाच सरकारचा मंत्र : राष्‍ट्रपती

वृद्धांच्या संख्येमुळे चीनच्या चिंतेत भर

खरं पाहिलं तर देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त झालेल्या चीनने एका अपत्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे नव्या पिढीच्या संख्येवर अनेक बंधने आली. सध्या चीनमध्ये त्यांच्या एकूण लोकसंख्येमध्ये वृद्धांची संख्या जास्त झाली आहे. देशाला काम करणाऱ्या तरुण मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या भेडसावत आहे.

गोव्यात निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी कामय राहील : संजय राऊत

लोकसंख्या वाढवण्यासाठी चीनची नवी योजना

चीन आणलेल्या नव्या योजनेनुसार आता तीन मुलं जन्माला घालण्याची परवानगी मिळाली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर आता देशातील कंपन्याही चीन सरकारच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत असेच म्हणावे लागेल. चीनमधील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मुलं जन्माला घालण्यास प्रोत्साहन देत आहेत. याबरोबरच चीनमधील काही प्रादेशिक सरकारेही तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी बोनस देताना दिसून येत आहेत. देशातील काही स्थानिक सरकारने दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावर संबंधित दांम्पत्याला पैसे देण्याची घोषणा केली आहे. चीन सरकारने महिलांच्या गर्भधारणेदरम्यान 98 दिवसांची मातृत्व रजा देखील मिळणार असल्याचे सांगितले आहे.

तासगाव-भिलवडी रस्त्यावर छोटा हत्तीने दिलेल्या धडकेत दोन जागीच ठार

तिसरे अपत्य जन्माला घातल्यास मिळणार मोठं बक्षीस

चीनमधील एका कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरनुसार पहिल्या अपत्याचा जन्म झाल्यास 30 हजार युआन (3 लाख 50 हजार रुपये), दूसरे मूल जन्माला आल्यास 60 हजार युआन (सुमारे 7 लाख रुपये) आणि तिसरे अपत्य जन्माला आल्यास 90 हजार युआन (सुमारे 11.50 लाख रुपये) एवढा बोनस कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. चीनमधील नामवंत टेक कंपनी Beijing Dabeinong Technology Group कडून कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी ऑफर देण्यात आली आहे. कर्मचाऱ्याच्या घरी तिसरे अपत्य जन्माला आल्यास 90 हजार युआन (सुमारे 11.50 लाख रुपये) बोनस देण्यात येणार आहे. एवढंच नाही तर कर्मचाऱ्याला एका वर्षाची सुट्टीही देण्यात येणार आहे.

Back to top button