नाशिक : आठ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नाशिक ; पुढारी ऑनलाईन ; सकाळपासून नाशिकरोड परिसरात आढळून आलेल्या बिबट्याचा शोध सुरु होता. अखेेर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. 8 तासांच्या प्रयत्नांनतर हा बिबट्या वनविभागाच्या पिंज-यात कैद झाला आहे. वनविभागाच्या गाडीत हा बिबट्या रवाना करण्यात आला आहे.

येथील जय भवानीरोड परिसरात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या घराच्या पाठीमागच्या जागेवर बिबट्या दिसला असल्याची माहिती मिळाली होती. बंगल्याच्या पार्किंगमध्ये बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. सकाळपासून या बिबट्याचा शोध सुरु होता. तब्बल आठ तास शोधाशोध केल्यानंतर अखेर हा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news