हृतिक रोशनसोबत हातात हात घालून फिरणारी ‘ती’ कोण ? | पुढारी

हृतिक रोशनसोबत हातात हात घालून फिरणारी 'ती' कोण ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या रिलेशनशीफमुळे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हृतिक मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर एका मुलीच्या (मिस्ट्री गर्ल ) हातात -हात घालून स्पॉट होताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होतं. ही मुलगी कोण? तिचे आणि हृतिकचे नातं काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. मात्र, सध्या या प्रश्नाला पुर्णविराम मिळाला आहे. ती मुलगी (मिस्ट्री गर्ल ) दुसरी तिसरी कोणी नसून एक अभिनेत्री असल्याचा खुलासा झाला आहे.

हृतिक रोशन नुकताच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर एका मुलीसोबत दिसला. यानंतर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. परंतु, हृतिकसोबत असलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. यामुळे चाहते वेगवेगळे कयास लावत होते. यात ही मुलगी कोण? तिचे आणि हृतिकचे काय नातं? तो तिला डेट करत आहे का? यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. याच दरम्यान मिस्ट्री गर्लचे कोण यांचा खुलासा झाला आहे.

मिस्ट्री गर्लचे नाव सबा आझाद

हृतिकसोबत स्पॉट झालेल्या मिस्ट्री गर्लचं नाव सबा आझाद असे आहे. सबा एक चांगली अभिनेत्रीसोबत संगीतकार आणि गीतकार आहे. ३२ वर्षीय सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं. त्यानंतर तिने २०११ मध्ये ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

सबाने आतापर्यंत ५ चित्रपटांत दिसली आहे. सबा शेवटची ‘फील्स लाइक इश्क’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय सबा सफदर हाश्मी यांची भाची आहे. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे ८१.७ हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय सबा दिग्दर्शक इशान नायरच्या Guroor या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती.

हृतिक रोशनसोबत सबा पहिल्यांदाच स्पॉट झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उघान आलं होतं. सध्या मिस्ट्री गर्लचे नाव समोर आल्याने हृतिकसोबत पसरलेल्या अफवांना पुर्णविराम मिळाला आहे.

हृतिक रोशन आणि तिची पत्नी सुझैन खान यांनी २०१४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेवून वेगळे झालं. दोघांना दोन मुले आहेत. सुझैन आणि हृतिक दोघेजण आपल्या मुलासोबत एकत्रित वेळ घालवत असतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button