प्रेमाची अनोखी केमिस्ट्री ‘वन फोर थ्री’ चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली | पुढारी

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री 'वन फोर थ्री' चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

पुढारी ऑनलाईन

अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमिक्रॉनमुळे पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. रोमँटिक चित्रपटांच्या यादीत वन फोर थ्री चित्रपटाने आपले नाव नोंदवले असले तरी हा चित्रपट काहीसा लांबणीवर गेला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नुकतीच समोर आली आहे.

प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक मायबाप ही आमच काळीज आहे! होय! आणि या काळजाच्या काळजीपोटीच सध्याचा कोविड संसर्ग आणि निर्बंधांमुळे आपल्या सर्वांच्या काळजाजवळची मराठी प्रेमकथा ११ फेब्रुवारी ऐवजी पुढे नेत आहेत.

दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट असून बॉलिवूडनेदेखील या चित्रपटाची दखल घेतली होती, हा चित्रपट ११ फेब्रुवारी ऐवजी ४मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

चित्रपटाची नवी तारीख जाहीर करत चित्रपटाचे दिग्दर्शक म्‍हणाले की, ‘जगभरात कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनची भीती यामुळे नववर्षात पुन्हा एकदा संकट येऊन उभे राहिले आहे. वन फोर थ्री चित्रपट हा प्रेमाचे फंडे देणारा असल्याने हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित करण्याचे आयोजले होते. मात्र कोरोना आणि ओमिक्रॉनच्या नव्या संकटामुळे ११ फेब्रुवारी ऐवजी हा चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार हे या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहेत.

विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपट प्रदर्शनात वितरकाचीही मुख्य भूमिका असते, या चित्रपटात अनिल थडाणी यांनी वितरकाची भूमिका अगदी योग्यरित्या निभावली आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button