सातारा : साहाय्यक फौजदार संभाजी बनसोडे यांना राष्ट्रपती पदक

सातारा : पुढारी वृत्तसेवा: प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला साहाय्यक फौजदार संभाजी बनसोडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. सध्या ते जिल्हा विशेष शाखेत कर्तव्य बजावत आहेत. साहाय्यक फौजदार संभाजी बनसोडे हे सातारचे असून 1990 मध्ये सातारा पोलिस दलात भरती झाले आहेत.
सातारा पोलिस (Police) दलात आतापर्यंत पोलिस दलात त्यांची 32 वर्षे सेवा झाली आहे. यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालक पदकाने 2016 मध्ये गौरवण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांनी पोलिस मुख्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पाचगणी, जिल्हा विशेष शाखा, विशेष शाखा येथे सेवा बजावली आहे. पोलिस दलात काम करताना विशेष शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील त्यांचे काम उल्लेखनीय राहिले आहे. आतापर्यंत त्यांना एकूण 360 रिवॉर्ड मिळाली आहेत.
हे ही वाचलं का
- कोल्हापूर : सहायक फौजदार भोसले, शिंदे यांना राष्ट्रपती पोलिस पदक
- प्रजासत्ताक दिन परेडवेळी दाट धुके असण्याची शक्यता
- दिल्लीत सातार्याचा गौरव; प्रजासत्ताकदिन परेडमधील चित्ररथावर कास पठार