इशार्‍यांमधून मते मागणारे शिवसेनेचे मौनी बाबा | पुढारी

इशार्‍यांमधून मते मागणारे शिवसेनेचे मौनी बाबा

मथुरा: जिल्ह्यातील छाता विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या मौनी बाबा यांनी मौन राहूनच प्रचारास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून ते लढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी खाणाखुणा करतच सांगितले की, त्यांच्याकडे 55 हजार रुपये आहेत. त्यातील 10 हजार अर्ज भरण्यासाठी खर्च झाले. उर्वरित 45 हजार फिक्स डिपॉझिट केले आहेत. मौनी बाबांचा आश्रम कोसीकला येथील पशुपती फॅक्टरीसमोर आहे. इशार्‍यांमधूनच ते लोकांना मतदानाचे आवाहन करत आहेत.

गेल्या 11 वर्षांपासून त्यांनी मौन पाळले आहे. खाणाखुणांतून ते लोकांशी बोलतात आणि याचप्रकारे त्यांनी अर्जही दाखल केला आहे. 2017 मध्ये त्यांनी विधानसभा आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केला होता; पण त्यांचा अर्ज बाद झाला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button