मन झालं बाजींद : कृष्णाचं पहिलं हळदी-कुंकू; पण डाव्या हाताने... | पुढारी

मन झालं बाजींद : कृष्णाचं पहिलं हळदी-कुंकू; पण डाव्या हाताने...

पुढारी ऑनलाईन

मन झालं बाजींद या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील व्यक्तिरेखा आणि त्यांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडला आहे. मन झालं बाजींद मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की, कृष्णाला जबरदस्त शॉक लागल्यामुळे तिचा उजवा हात निकामी झाला आहे. त्याच्या हाताच्या संवेदना निघून गेल्या आहेत.

मकरसंक्रांती निमित्त कृष्णाचं पहिलंच हळदीकुंकू आयोजित केलं आहे. हळदी-कुंकू हे उजव्या हाताने लावायचं अशी मान्यता आहे. पण कृष्णाचा उजवा हात निकामी झाला असल्यामुळे ती डाव्या हाताने हळदी-कुंकू लावते. त्यामुळे सगळ्या बायका कुजबुज करायला लागतात. पहिलंच हळदी-कुंकू आणि कृष्णाला उजव्या हाताने हळदी-कुंकू लावता येत नाही आहे. यावरून सगळ्या बायका तिला टोमणे मारायला लागतात.

त्यावेळी राया कृष्णाच्या मदतीला धावून येतो आणि सगळ्यांना समजवतो की, आपण डावा-उजवा यामध्ये भेदभाव करण्यापेक्षा परंपरेला महत्व दिलं पाहिजे. एखाद्याच्या व्यंगांची मस्करी करण्यापेक्षा त्याने मनापासून जपलेल्या परंपरेला महत्व द्या, असा संदेश मन झालं बाजींद या मालिकेतील आगामी भागात मिळणार आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ – सांगलीच्या मॅकॅनिकचा जुगाड! भंगारातून ३० हजारांत बनवली ‘फोर्ड कार’

Back to top button