women viral video : दुकानदार पैसे परत देईना म्हणून महिलेनं १२ लाखांच्या ड्रेसच्या केल्या चिंध्या | पुढारी

women viral video : दुकानदार पैसे परत देईना म्हणून महिलेनं १२ लाखांच्या ड्रेसच्या केल्या चिंध्या

पुढारी ऑनलाईन डेस्क

रागात माणूस काहीही करतो, म्हणून म्हणतात रागावर ज्याचे नियंत्रण तो स्वत:वर विजय मिळवतो. कारण रागावर नियंत्रण करणे अवघड असते. रागात माणसाला समजत नाही तो काय करतो आणि जेव्हा समजत तेव्हा त्याचा राग शांत झालेला असतो. मग तो विचार करतो की त्याने काय केले. अशीच एक घटना चीनमधील महिलेची असून तेथील एका महिलेला जास्त राग आल्यावर तिने ब्राइडल सलूनमध्ये जाऊन लग्नाचे किती तरी ड्रेस फाडले. त्या महिलेचे नाव माहिती नाही पण तिचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. (women viral video) 

व्हायरल व्हिडिओमध्येती कात्री घेऊन सगळे ड्रेस फाडताना दिसत आहे. ही गोष्ट चीनमधील चांगक्यॉंगमधील आहे. तिने मागीलवर्षी त्या सलुनमध्ये लग्नाचे पॅकेज घेतले होते, त्यासाठी तीने १२५० डॉलर (९२,००० रूपये) मोजले होते.

त्या महिलेने गेल्या एप्रिलमध्ये लग्नाचे पॅकेज घेतले होते. तिने सांगितले होते की, तिचे लग्न ५ ऑक्टोबरला आहे. नंतर तिने सांगितले तिच्या लग्नाची तारीख पुढे घेतली आहे. पुन्हा तिने नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे सांगत सगळे पैसे परत मागू लागली. मात्र, दुकानदारांने स्पष्ट नकार दिला आणि त्या महिलेचा पारा चढला. (women viral video) 

व्हिडीओमध्ये अस दिसतं की, ती महिला लग्नाचे ड्रेस कात्रीने फाडत आहे. ती कोणाचे ऐकून घेण्याच्य मनस्थितीत नाही. तिने जवळपास लग्नाचे ३२ ड्रेच फाडून ८ लाखांचे नुकसान केले.

हे ही वाचलं का?

Back to top button