जळगाव : ‘बोदवड नगर पंचायत’साठी मतदान सुरू | पुढारी

जळगाव : 'बोदवड नगर पंचायत’साठी मतदान सुरू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

‘बोदवड नगर पंचायत’च्या उर्वरित चार जागांसाठी आज मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी थंडीचा  प्रभाव असल्‍याने संथ गतीने मतदानाला सुरुवात झाली आहे.  सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ९.४० टक्के मतदान झाले होते.

बोदवड नगर पंचायतीमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील १३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान झाले आहे. तर आज ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ज्या चार जागांवर मतदान होत आहे. यात मुख्यतः राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच आहे.

अफवा पसरवून काँग्रेसवाल्यांनी आपल्याच नेत्याचा पराभव केला, एका गोष्टीने बदलले वातावरण

बोदवड नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक २, ३, १५, १७ साठी  मतदान होत आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये पाच उमेदवार आहेत. या चारही पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये चार उमेदवार आहेत. यात भाजप-सेना राष्ट्रवादी काँग्रेस व एक पक्ष आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये  चार उमेदवार असून सेना राष्ट्रवादी व दोन अपक्ष उमेदवार आहेत. तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष प्रभाग क्रमांक १५ मध्ये लागलेले आहे. जिल्हा पोलीस दलाने मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचलं का? 

 

 

पाहा व्हिडिओ – प्रा. एन. डी. पाटील अखेरचा लाल सलाम

Back to top button