मन उडू उडू झालं : देशपांडे सर सानिकासाठी सुचवणार इंद्रजित साळगावकरचं स्थळ

पुढारी ऑनलाईन
झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, इंद्राने आपल्या मनातील भावना दिपूसमोर व्यक्त केल्या. दिपूने इंद्राच्या भावनांचा स्वीकार देखील केला. पण दिपूने अजून तिच्या मनातील इंद्राबद्दलच प्रेम इंद्रा समोर व्यक्त केलं नाही आहे.
दुसरीकडे कार्तिक देशपांडे सरांकडे सानिकाचा हात मागण्यासाठी भेटायला येतो. पण देशपांडे सर त्याची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि घरातून हाकलून देतात. त्यामुळे सानिका दुखावते आणि घरात कोणाशीच नीट बोलत नाही आहे.
सानिकाचं हे वागणं पाहून बाबा खूप काळजीत आहेत. अशातच ते सानिकासाठी साळगावकरचं स्थळ म्हणून विचार करतात. साळगावकर हाच इंद्रा आहे याची कल्पना देशपांडे सरांना नाही. त्यामुळे दिपूवर प्रेम असलेल्या इंद्राच स्थळ सानिकासाठी सुचवल्यावर काय गोंधळ होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
- whale fish vomit : व्हेल माशांची उलटी, खवल्या मांजर, घोरपडींसाठी एवढे पैसे का मोजले जातात?
- curry leaves : कढीपत्ता चेहाराही खुलवतो; कढीपत्त्याचे हे ३ फेसपॅक घरी बनवा
- unposed movie : ‘अनपॉज्ड : नया सफर’चा ट्रेलर १५ जानेवारीला होणार रिलीज