Curry leaves : कढीपत्त्याचा वापर भाजी, डाळ, आमटी आणि वेग-वेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण चव वाढवणारा हा कढीपत्ता औषधीही आहे.अपचन, अतिसार, उल्टी, पोटदुखी, मधुमेह अशा उपचारांसाठी वापर करतात. कढीपत्ता त्वचेचे आजारांवरही उपयुक्त आहे. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरला जातो.
कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरीयल गुण असतात जे त्वचेचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मदत करतात. कढीपत्ता चेहऱ्यावरील पिंपल्स , पुरळ आणि डाग यावरही उपयुक्त आहे. कढीपत्ता सर्व प्रकारच्या त्वचांना उपयुक्त आहे. चेहऱ्यावर याचा वापर केल्यावर त्वचा मॉश्चराइज राहते. कढीपत्त्या मुळे चेहऱ्यावर तजेला येतो.