whale fish vomit : व्हेल माशांची उलटी, खवल्या मांजर, घोरपडींसाठी एवढे पैसे का मोजले जातात?

whale fish vomit : व्हेल माशांची उलटी, खवल्या मांजर, घोरपडींसाठी एवढे पैसे का मोजले जातात?
Published on
Updated on

कोल्हापूर; संदीप शिरगुप्पे : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने आणि काही औषधांसाठी व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून व्हेल माशाची उलटी, खवल्या मांजर, घोरपड, पारवाळ, यांच्यासह वन्य प्राण्याची तस्करी होत आहे. या तस्करींचे प्रमाण कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, आणि रत्नागिरी जिल्ह्यात अधिक आहे. (whale fish vomit)

याबाबत या जिल्ह्यात वन्य जीवरक्षक काम करत असतात. यामुळे प्राण्यांच्या हत्येचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर तस्करी करणाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. याबाबत मानद वन्य जीवरक्षक अपराध नियंत्रणचे सदस्य रोहन भाटे यांनी व्हेल माशाच्या उलटी आणि अन्य प्राण्यांच्या तस्करीच्या रॅकेटबाबत माहिती दिली आहे.

whale fish vomit : व्हेल माशांची उलटीला एवढी का किंमत

व्हेल माशांची उलटीला एवढी किंमत का असते याबाबत रोहन भाटे यांनी माहिती दिली. ते म्हणाले कि, व्हेल माशाची उलटी ही समुद्रामध्ये तरंगत असते यासाठी विशेष लोकांचे लक्ष लागून असते. ही उलटी समुद्रातून सुरक्षितरित्या बाहेर आणत त्याची चोरी केली जाते.

या माशाच्या उलटीला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींची किंमत मिळत असते. याचा वापर महागड्या सेंट, बॉडीस्प्रे बनवण्यासाठी केला जातो. व्हेल माशाच्या उलटीला वेगळ्या प्रकारचा सुंगध असतो. हा सुगंध दिर्घकाळ टिकत असल्याने या उलटीला नामांकित कंपन्यांकडून मागणी असते. यासाठी नामांकिंत कंपन्या वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार असतात.

काल कोल्हापुरात झालेल्या कारवाईतील व्हेल माशाच्या उलटीची अंदाजे किंमत ३ कोटींच्या घरात आहे. कोल्हापुरातील ही पहिलीच कारवाई आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने आणि काही औषधांसाठी व्हेल माशाच्या उलटीला मोठी किंमत आहे. (whale fish vomit)

वन विभाग आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई केली. ही उलटी त्यांनी नेमकी आणली कोठून? याचा शोध सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

खवल्या मांजराचा वापर बुलेटप्रुफ जॅकेट बनवण्यासाठी

खवल्या मांजर हा अतिशय दुर्मीळ असणारा प्राणी आहे. जंगलामध्ये याची तस्करी करण्यासाठी कित्येक लोक दबा धरून बसलेले असतात. खवल्या मांजराचा विशेष वापर हा बुलेटप्रुफ जॅकेट बनवण्यसाठी केला जातो. याचे खवले वेगळेकरून त्यापासून जॅकेट बनवले जाते. तर काही ठिकाणी खवल्या मांजराचा अंधश्रद्धेसाठी वापर केला जातो.

यासाठी मांजराची तस्करी करून लाखो रुपये कमवले जातात. तसेच चीनच्या बाजारपेठेत खवल्याला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चीनमध्ये त्याचा वापर खाण्यासाठी केला जातो. दरम्यान, चीनमधून खवल्या मांजरापासूनच कोरोना आल्याचे बोलले जाते. चीन पाठोपाठी भारतातही काही ठिकाणी खवल्या मांजराचे मांस खात असल्याने त्याला मागणी असते.

घोरपडीच्या गुप्तांगाचा वापर अंधश्रद्धा आणि तेल काढण्यासाठी

घोरपडीचे मांस आणि तेल काढण्यासाठी सर्रास वापर केला जातो. मांस खाण्यासाठी घोरपडी मारल्या जातात. याचे मांस उत्तम दर्जाचे असते तर औषध बनवण्यसाठी घोरपडीचे तेल काढले जाते. घोरपडीपासून एक विशिष्ट प्रकारचे तेल बनवण्यात येते. ते तेल सांधेदुखीवर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते असा समज आहे. घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी पडते अशा गैरसमजुतीतून घोरपडींची हत्या केली जाते.

तसेच घोरपडीचा वापर अंधश्रद्धेसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. घोरपडीचे गुप्तांग कापून त्याचा वापर अंधश्रद्धेसाठी केला जातो. घोरपडीच्या गुप्तांगाला हप्ताजोडी असे बोलले जाते.

या हप्ताजोडीचा वापर करून कर्मकांड करणे, एखाद्यावर प्रभाव टाकण्यासाठी केला जातो. यातून फक्त अंधश्रद्धा बळावते काहीही सिद्ध झाले नसल्याचे भाटे म्हणाले.

यासाठी लोक बोलेल तेवढी किंमत देऊन याची खरेदी करतात. तांत्रिक मांत्रिक यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे आढळून आले आहे. पैशाचा पाऊस पाडणार घरात असे काही सांगून मांत्रिक लोकांची लुबाडणूक करतात. यातून प्राण्यांची हत्या होते. हे रोखण्यासाठी आम्ही काम करत असल्याचे ते म्हणाले.

अशा अनेक कारवाया रोखण्यासाठी भाटे यांनी काम केल्याचे सांगितले. परंतू चोरून बऱ्याच ठिकाणी याची देवाणघेवाण होत असते यावर गुप्त माहिती मिळवत आम्ही काम कारवाई करत असल्याचे ही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news