सेल्फी लेले रे! अक्षय कुमार-इम्रान हाश्मी एकत्र सेल्फीमध्ये | पुढारी

सेल्फी लेले रे! अक्षय कुमार-इम्रान हाश्मी एकत्र सेल्फीमध्ये

पुढारी ऑनलाईन

अक्षय कुमारच्या कामाचा आवाका सर्वांनाच थक्‍क करणारा आहे. त्याचे वर्षभरात 4 ते 5 चित्रपट रीलिज होत असतात. काही काळापूर्वीच तो एका मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करत असल्याचे आम्ही सांगितले होते. आता या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे.

‘सेल्फी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यात अक्षय कुमार-इम्रान हाश्मी देखील आहेत. दोघांनीही सेल्फीच्या पोजमधील फोटो शेअर करून याबाबतची माहिती सोशल मीडियातून दिली आहे. एक पोलिस अधिकारी आणि चित्रपटातील एक सुपरस्टार यांच्यातील ही कहाणी असणार आहे.

 

Back to top button