Poonam Pandey : पूनमनं सर्वांसमोर असं काही केलं की त्यामुळं नेटकऱ्यांना घाम फुटला | पुढारी

Poonam Pandey : पूनमनं सर्वांसमोर असं काही केलं की त्यामुळं नेटकऱ्यांना घाम फुटला

पुढारी ऑनलाईन डेस्क

पूनम पांडे (Poonam Pandey) हे नेहमीचं चर्चेतलं नाव. तिने फोटोग्राफरसाठी पोज देणं काही नवी गोष्ट नाही. पण, नेहमी वादग्रस्त गोष्टींमुळे राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चांगलीचं चर्चेत आली आहे. आता ती तिच्या वादग्रस्त स्टेंटमेंटमुळे नाही तर विचित्र कपडे आणि अश्लील हावभावमुळे ती चर्चेत आली आहे. (Poonam Pandey)

पूनमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती अश्लील हावभाव करत फोटो पोज देताना दिसते. ऑरेंज कलरचे बोल्ड कपडे घालून ती फोटोग्राफर्सना पोज देतेय. यावेळी ती अश्लिल हावभाव करते. यावरून काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केलीय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजरनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

मोकळे केस सोडून ती बोल्ड टॉप घालून फोटोग्राफर समोर पोज द्यायला उभी राहते. न्यूड मेकअप आणि जीभ बाहेर काढून विचित्र हावभाव केल्याचा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला गेला. तिने वेगवेगल्या अंगलने फोटो पोज दिले.

हा व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी भडकले. संतापलेल्या काही नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंट करत टीका केलीय. तिने ऑरेंज कलरचा क्रॉप टॉप घातला होता. हा टॉप बोल्ड असल्याने तिला ट्रोल करण्यात आले. कदाचित तिला तिच्या मापाचा टॉप मिळाला नसेल, असं एका नेटकऱ्याने तिला म्हटले आहे. या फोटोग्राफर्सना दुसरे सेलिब्रिटीज दिसत नाहीत का? असे एका युजरने प्रश्न विचारला आहे.

पूनम अनेकदा ट्रोल होते. पण, तिची ही पहिलीच वेळ नाहीये. पूनम लग्नावरूनही चर्चेत आली होती. तिला तिच्या पतीने मारहाण केल्यानंतर पती सॅम बॉम्बेला पोलिसांनी अटक केली होती. सॅम बॉम्बेने तिला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पूनम पांडेने मुंबई पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली होती.

त्यावेळी पोलिसांनी माहिती दिली होती की , पूनम पांडे जखमी अवस्थेत तक्रार करण्यासाठी आमच्याकडे आली होती. तक्रार दाखल केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सॅम बॉम्बेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यावेळी मारहाणीत पूनमच्या डोक्याला, डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.

Back to top button