Nilu Phule Biopic : निळू फुले पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार ! | पुढारी

Nilu Phule Biopic : निळू फुले पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार !

मुंबई; पुढारी ऑनलाईन

 आपण अनेक प्रसिद्ध खेळाडुंचे, अभिनेत्यांचे तसेच शूरवीरांचे बायोपिक सिनेमे पाहिले आहेत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील केली आहे. मराठी सिनेमासृष्टीतील एक दिग्गज तसेच मराठी-हिंदी चित्रपट, रंगभूमीवरील एक अष्टपैलू अभिनेता दिवंगत निळू फुले ( Nilu Phule Biopic ) यांचा जीवनपट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

निर्माता कुमार तौरानी यांनी निळू फुले ( Nilu Phule Biopic ) यांच्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याचे सांगितले. निळू फुले यांची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले यांच्याकडून या बायोपिकसाठीचे हक्कही विकत घेतल्याचे समजते. यावर्षी या चित्रपटाचे काम सुरू होऊ शकते.

अद्याप या चित्रपटात निळू फुले ( Nilu Phule Biopic ) यांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच इतर कालाकरांच्या निवडी देखील व्हायच्या आहेत. हिंदीमध्‍ये या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. त्याच बरोबर हा चित्रपट मराठी येईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही; पण निळू फुले यांना बॉलिवूडमध्येj[ मोठे स्थान होते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यामुळे या चित्रपटाला संपूर्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळेल. नुकताच डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर अभिनेता सुबोध भावे याने बायोपीक बनवला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटात निळू फुले यांचे जवळचे मित्र अभिनेते श्रीराम लागू यांची भूमिका सुमीत राघवन याने केली होती.

बायोपिकमधून एक स्वातंत्र्यसैनिक, एक अभिनेता आणि एक सामाजिक कार्यकर्ता असा निळुभाऊंचा प्रवास उलगडला जाणार आहे, असे तौरानी यांनी सांगितले. 250 हुन अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटात निळू फुलेंनी अभिनय केला हाेता. निळु फुलेंनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात मराठी नाटक ‘अकलेच्या कांद्याची गोष्ट’ पासून केली होती. तर ‘एक गाव बारा भानगडी’ पासून त्यांच्या चित्रपटातून कारकिर्दीची सुरवात केली होती. ‘कुली’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत तर मशालमध्ये ‘दिलीपकुमार’सोबतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या खलनायकी भूमिका विशेष गाजल्या.

खर्‍या आयुष्यात मात्र ते समाजाला दिशा दाखवणारे नायकच होते. 2009 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gargi Phule (@gargiphule)

Back to top button