मूकबधिर अल्पवयीन मुलीस बलात्कारानंतर पुलावर फेकले | पुढारी

मूकबधिर अल्पवयीन मुलीस बलात्कारानंतर पुलावर फेकले

अलवर : वृत्तसंस्था, राजस्थानातील अलवरमध्ये मंगळवारी ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्यानंतर कारमधून तिला पुलावर फेकून देण्यात आले. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पुलावर तासभर तडफडत राहिली.

मदतीसाठी ती ओरडूही शकत नव्हती. पोलिसांनी तिला अलवर रुग्णालयात दाखल केले. मुलगी अत्यवस्थ असल्याने येथील डॉक्टरांनी पुढील उपचारार्थ तिला जयपूर रुग्णालयात रवाना केले. जे. के. लोन रुग्णालयात मुलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, मुलीची प्रकृती अद्याप नाजूक आहे. गँगरेप करणारे नराधम फरार आहेत.

अलवरच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, पुलापर्यंत जाणार्‍या रस्त्यावरील प्रत्येक सीसीटीव्ही आम्ही तपासत आहोत. मंगळवारी मूकबधिर मुलगी मालाखेडाहून अलवरला आली होती. ती टेम्पोत बसलेली होती. नंतर सामूहिक बलात्काराची घटना घडली, असे तपासात समोर आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button