allu arjun
allu arjun

Allu Arjun : १०० कोटींचं आलीशान घर, ३६० कोटींच्या संपत्तीचा मालक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) मागील काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पुष्पाने धुवाँधार कमाई करत ३०० कोटींचं कलेक्शन आहे. चित्रपट पाहिल्य़ानंतर बॉलीवूडमध्ये अल्लू अर्जुनची (Allu Arjun) डिमांड वाढली आहे. अल्लू अर्जुन आपल्या दमदार अभिनय आणि दमदार ॲक्टिंग स्टाईलमुळे लाखों प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. अल्लूचे फॅन फॉलोइंगदेखील स्ट्रॉन्ग आहे. देशभरातचं नव्हे तर परदेशातही त्याचे लाखो फॅन्स आहेत.

अल्लू साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा भाचा आहे. यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्याने आपली खास ओळख बनवली. अर्जुनचं लाईफ स्टाईल लक्झरियस आहे. आज आम्ही तुम्हाला अर्जुनचे घर, वॅनिटी आणि संपत्तीविषयी सांगणार आहोत.
अल्लूचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत समीविष्ट आहे. आलीशान घर, कोटींच्या गाड्या, लक्झरी लाईफस्टाईल हे कुण्या राजकुमारच्या रॉयल लाईफपेक्षा कमी नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, त्याचे वार्षिक उत्पन्न ३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. अल्लूची संपत्ती ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. अल्लू एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये मानधन घेतो; पण, त्याच्या वैकुंठपुरमल्लो या चित्रपटासाठी त्याने २५ कोटी रुपये घेतले होते. याशिवाय, अल्लू एका जाहिरातीसाठी ३ कोटी रुपये मानधन घेतो.

त्याच्या हैदराबाद येथील बंगल्याची किंमत १०० रुपये कोटींहून अधिक आहे. जुबली हिल्स येथे आपल्या घरात अल्लूने लोकप्रिय इंटीरियर डिझायनर आमिर आणि हामिदा यांच्याकडून डेकोरेट करून घेतलं आहे. आमिर आणि हमीदाने अल्लू आणि त्याच्या पत्नीला जसं हवं तसं घर डिझाईन केलं आहे. पहिले घर बॉक्स शेपमध्ये आहे. बाहेरून त्याचं घर एखाद्या बॉक्सप्रमाणे दिसत असेल. पण, त्याचं इंटीरियर पाहण्यासारखं आहे. घराच्या आत शानदार कॉरिडोर आहे. जे लिव्हिंग स्पेसकडे जातो. आत लिव्हिंग रूम, डायनिंग, किचन ते बार काउंटरपर्यंत फॅसिलिटीज आहेत.

आलीशान घराला त्याची पत्नी स्नेहाच्या पसंतीने सजवण्यात आलं आहे. घराचं संपूर्ण इंटीरियर आमिर – हमीदाने तयार केलं आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवण्यात आलं आहे. अल्लू नेहमी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओज शेअर करतो. या व्हिडिओत सुंदर घराची झलक पाहायला मिऴते. या व्हिडिओजमध्ये समजतं की, अल्लूच्या घरात एक मोठं लॉन आहे.

लिव्हिंग रूमला ऑल व्हाईट टच देण्यात आलं आहे. या लिव्हिंग रूममध्ये लायटिंगदेखील व्हाईट करण्यात आली आहे. याशिवाय त्याने पत्नी स्नेहासोबत एक फोटो शेअर केला होता. अल्लू -स्नेहा रेड्डीच्या घरात एक सुंदर किचनदेखील आहे. येथे टॉप शेफ जेवण बनवतात. या किचनलादेखील व्हाईट टच देण्यात आलं आहे. या किचन जवळ एक डायनिंग टेबल आहे.

मरून रंगाच्या या टेबलवर त्याची संपूर्ण फॅमिली जेवणाची चव चाखते. या आलीशान घरात एक स्विमिंग पूलदेखील आहे. येथे अल्लू आपल्या मुलांसोबत दंगा मस्ती करताना दिसतो. इतकचं नाही तर या स्विमिंग पूलच्या आसपास बगीचादेखी आहे.

अनेक लक्झरी कारचा मालक

अल्लू अनेक लक्झरी कारचा मालक आहे. त्यांची किंमत जवळपास ४ ते ५ कोटी रुपये आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर, ऑडी आणि BMW सीरिजच्या महागड्या गाड्यादेखील आहेत. अल्लूजवळ BMW X6 Coupe कार आहे. याचा नंबर ६६६ आहे. याशिवाय, त्याच्याकडे Jaguar आणि Porsche यासारख्या कोटींच्या कार आहेत.

अल्लूजवळ सर्वात महाग वॅनिटी व्हॅन आहे. अल्लूने २०१९ मध्ये ही वॅनिटी खरेदी केली होती. तिचं नाव Falcon असं ठेवलं आहे. ही वॅनिटी व्हॅन बाहेरून जितकी सुंदर दिसते. तितकी आलीशान आहे. या व्हॅनचे फोटो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news