Closing Bell | सेन्सेक्स ६६,१७४ वर बंद, टाटा, अदानींच्या शेअर्समध्ये तेजी, कारण काय?

Closing Bell | सेन्सेक्स ६६,१७४ वर बंद, टाटा, अदानींच्या शेअर्समध्ये तेजी, कारण काय?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सपाट खुल्या झालेल्या शेअर बाजारात आज मंगळवारी (दि.२८) जोरदार रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स २०४ अंकांनी वाढून ६६,१७४ वर बंद झाला. तर निफ्टी ९५ अंकांच्या वाढीसह १९,८८९ वर स्थिरावला. विशेष म्हणजे टाटा आणि अदानी समूहाच्या शेअर्सनी बाजारात आज उत्साह निर्माण करण्याचे काम केले. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

क्षेत्रीय पातळीवर काय स्थिती?

क्षेत्रीय पातळीवर पॉवर, ऑईल आणि गॅस निर्देशांकात प्रत्येकी ३ टक्के वाढ झाली. तर मेटल, ऑटो आणि पीएसयू बँक निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यानी वाढले. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि फार्मा स्टॉक्समध्ये काही प्रमाणात विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

टाटा मोटर्स टॉप गेनर

सेन्सेक्सवर आज टाटा मोटर्सचा शेअर टॉप गेनर होता. हा शेअर ३.७६ टक्क्यांनी वाढून ६९९ रुपयांवर पोहोचला. बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एनटीपीसी, टायटन, ॲक्सिस बँक, एम अँड एम, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २.५० टक्क्यांदरम्यान वाढले. तर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स किरकोळ प्रमाणात घसरले.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, बीपीसीएल आणि कोल इंडिया हे टॉप गेनर्स राहिले, तर आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल्स, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि सन फार्मा हे टॉप लूजर्स होते.

अदानींच्या गुंतवणूकदारांना १.२ लाख कोटींचा फायदा

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, हिंडेनबर्ग प्रकरणी शुक्रवारच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतून गुंतवणूकदारांनी सकारात्मक अर्थ काढल्यामुळे आज मंगळवारी अदानी कंपन्यांचे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत वाढले. यामुळे गुंतवणूकदारांना केवळ एका ट्रेडिंग सत्रात १.१९ लाख कोटींचा फायदा झाला.

अमेरिकेची शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्गने गेल्या २४ जानेवारी रोजी अदानी उद्योग समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा तसेच कंपन्यांच्या ताळेबंदात गडबड असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर उद्योग-व्यापार एकच खळबळ उडाली होती तर संसदेतही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.

आज सर्व १० अदानी कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे एकत्रित बाजार भांडवल दुपारच्या व्यवहारात ११.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. पण ते अजूनही हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध होण्याच्या एक दिवस आधीच्या १९.२ लाख कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

अदानी टोटल गॅसचे शेअर्स पॅकमध्ये सर्वाधिक वाढले. हा शेअर सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढला. त्यानंतर अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, एनडीटीव्ही आणि अदानी एंटरप्रायजेस १० ते १७ टक्क्यांदरम्यान वाढले. ( (Stock Market Closing Bell)

दरम्यान, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे गेल्या काही दिवसांपासून ऑईल स्टॉक्स तेजीत राहिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news