वेध शेअर बाजाराचा : बाजार जैसे थे, तरीही आशादायक | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : बाजार जैसे थे, तरीही आशादायक

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

सप्ताहात बाजाराची तेजीची गती अधिकच संथ आणि अतिसावध झाल्याचे पाहायला मिळाले. निफ्टी, सेन्सेक्स हे निर्देशांक अर्धा टक्क्यांपेक्षा कमी, तर निफ्टी बँक अर्धा टक्क्याने वाढले. निफ्टी 19800 च्या महत्त्वाच्या उंबरठ्यावर आहे. सेन्सेक्सही 66000 चा दरवाजा ठोठावत आहे. येत्या सप्ताहात निफ्टी बँक 44000 पार करेल. पुढील रविवारी म्हणजे 3 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. मार्केटला दिशा ठरवायला याच निकालांची प्रतीक्षा असेल.

ओबेरॉय, रिअ‍ॅल्टीने आपल्या पहिल्या Luxyry Residential Project ची घोषणा केली. ठाण्यामध्ये 18 एकर जागेमध्ये असे पाच टॉवर्स कंपनी बांधणार आहे. हा शेअर 52 Week च्या पातळीवर आहे. शुक्रवारचा त्याचा भाव आहे. रु. 1390.95.

टिटागर रेल सिस्टीम या रेल्वे शेअरनेही 52 Week चा पल्ला गाठला (रु. 983.30) गेल्या एक महिन्यात हा शेअर 30 टक्के वाढला आहे, तर वर्षभरात तो दुप्पटीपेक्षा अधिक वाढला आहे. Auto Components सेक्टरमधील Talbros ही एक प्रथितयश कंपनी आहे. पॅसेंजर व्हेईकल्स, कमर्शिअल व्हेईकल्स, टू-व्हीलर्स, थ्री-व्हीलर्स, इंडस्ट्रीयल व्हेईकल्स, अ‍ॅग्रीकल्चरल, व्हेईकल्स अशा सर्व वाहनांना ऑटो कंपोनंटस् ती पुरवते. उत्कृष्ट अशी ही कंपनी आहे. मागील एक महिन्यात हा शेअर 55 टक्के, तर 1 वर्षात जवळजवळ अडीचपट वाढला आहे. 307 रुपयांना हा शेअर आज मिळतो आहे. लवकरच तो 500 रुपयांपर्यंत वाढेल.

सर्व्होटेक पॉवर सिस्टीम ही कंपनी LED Lighting UPS Systems, Inverters आणि Batteries बनवते. नुकतीच कंपनीला BPCL कडून EV Chargers बनविण्याची मोठी ऑर्डर मिळाली. रु. 77.75 भाव असणार्‍या शेअरची किंमत एका वर्षापूर्वी केवळ 13 रु. होती. म्हणजे तिथून हा शेअर साडेचारशे पट वाढला आहे. शिवाय तो 100 रुपयांच्या पातळीला स्पर्श करून आला आहे. बीपीसीएलच्या ऑर्डरमुळे पुन्हा त्याचा शंभरीकडे प्रवास सुरू होईल.

या सप्ताहात General Insurance Corporation आणि New India Assurance या साधारणत: विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे 27 टक्के आणि 41 टक्के वाढले. हे दोन्हीही शेअर्स मागील एका वर्षात दुपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. शेअर मार्केटमध्ये पैसा मिळवणे अवघड आहे काय? मुळीच नाही. फक्त आपला चौफेर अभ्यास हवा. सोबत भविष्याचा वेध घेण्याची द़ृष्टी हवी. एकूणच, विमा (आयुर्विमा आणि साधारण विमा) या विषयाबद्दल लोक अधिक सजग होऊ लागले आहेत. सर्वसाधारण विमा क्षेत्रामधील वरील दोन सरकारी कंपन्या आणि ICICI Lombard General Insurance Company या तीनच कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत.

Jefferies ही एक सुप्रसिद्ध ग्लोबल ब्रोकरेज फर्म आहे. ती आपल्या ग्राहकांसाठी एक Model Port falio बनवते. नुकतेच तिने आपल्या भारतासाठीच्या पोर्टफोलिओमध्ये काही बदल केले. मारुती, पॉवरग्रीड आणि मॅरिको हे शेअर्स वगळून त्यांच्या जागी आयशर मोटर्स, एनटीपीसी आणि होनासा कंझ्युमर या शेअर्सचा समावेश करण्यात आला. येणार्‍या दोन वर्षांमध्ये दुचाकी वाहनांना अधिक मागणी राहील, असा जेफरीजचा अभ्यास आहे. पॉवर ग्रीडपेक्षा एनटीपीसीची EPS Growth अधिक आहे. आणि मॅरिकोपेक्षा होनासा कंझ्युमरची Volume Growth अधिक आहे. असे जेफरीजने म्हटले आहे. वरील तीन शेअर्सशिवाय मॉडेल पोर्टफोलिओमध्ये जेफरीजने Coal India, HDFC Bank आणि ICICI Prudential Life Insurance Company यांचाही समावेश केला आहे.

या आठवड्यांकडे अवघ्या गुंतवणूक विश्वाचे लक्ष होते; ते एकाच गोष्टीमुळे Tata Technologies चा आयपीओ! खरे म्हणजे या आठवड्यात Tata Technologies सहित Febank Financial Services, Gandhar Oil Refinery, Flair Writing Industries, India Renewanle Energy या पाच कंपन्यांच्या IPOS साठी सबस्क्रीप्शन झाले. परंतु सर्वांचे लक्ष टाटा टेक्नॉलॉजीजकडे होते. हा इश्यू 70 पट अधिक Subscribe झाला, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते.

एकतर टाटा या नावाची जादू आणि 2004 मधील TCS च्या IPO नंतर वीस वर्षांनी आलेला IPO. शिवाय 1994 पासून ग्लोबल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस Profit making कंपनी. 30 डिसेंबरला शेअर्सचे Allotment आहे. ग्रेमार्केटमध्ये कंपनीचा भाव 81 टक्के आहे. लिस्टिंग प्राईसची साधारण कल्पना आपण करू शकतो.

पुढील आठवड्यात मार्केट कसे राहील? परदेशी गुंतवणूक संस्थांनी (FII) आपली खरेदी वाढवली आहे. देशी संस्थांची खरेदी विना खंड सुरूच आहे. एकूण चिल आशादायक आहे.

Back to top button