Tata Tech IPO ने मोडला LIC चा विक्रम, जाणून घ्या लिस्टिंग कधी होणार? | पुढारी

Tata Tech IPO ने मोडला LIC चा विक्रम, जाणून घ्या लिस्टिंग कधी होणार?

पुढारी ऑनलाईन : टाटा टेक्नॉलॉजीजच्या (Tata Tech IPO) ३,०३४ कोटींच्या IPO ने एलआयसी (LIC) चा विक्रम मोडला आहे. टाटा समुहातील या कंपनीची इनिशिअल पब्लिक ऑफरिंग २१ हजार कोटी होती. त्यासाठी गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या ‘आयपीओ’साठी विक्रमी ७३.५८ लाख अर्ज आले. टाटा टेक आयपीओ (Tata Tech IPO) ला ६९.४३ पट ओव्हरसबस्क्राइब केले गेले. त्यासाठी गुंतवणूकदारांनी ७३.५८ लाख अर्ज करून १.५७ लाख कोटी रुपये मोजले. शुक्रवारी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी बंद झाला.

संबंधित बातम्या 

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘आयपीओ’साठी केलेल्या अर्जांच्या संख्येच्या बाबतीत टाटा टेकने मे २०२२ मध्ये आलेल्या LIC आयपीओचा ७३.३८ लाख अर्जांचा विक्रम मोडला आहे. शेअर बाजारात आयपीओ अर्जांच्या बाबतीत रिलायन्स पॉवर तिसऱ्या स्थानावर आहे. जानेवारी २००८ मध्ये आलेल्या रिलायन्स पॉवर ‘आयपीओ’साठी ४८ लाख अर्ज प्राप्त झाले होते.

टाटा टेक आयपीओ विषयी (Tata Tech IPO)

Tata Tech IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला होताच त्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) भाग २०३ पट सबस्क्राइब झाला. तर उच्च निव्वळ संपत्ती धारक व्यक्तींच्या (HNI) भागाला ऑफर रकमेच्या ६२ पट बोली मिळाली. रिटेल सेगमेंटमध्ये या आयपीओला १६.५ पट सबस्क्रिप्शन मिळाले.

हा IPO पुढील आठवड्यात शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे, पण अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही.

६५,८५०,२७८ शेअर्सचा हा IPO पूर्णपणे प्रमोटर टाटा मोटर्स आणि दोन गुंतवणूकदार अल्फा टीसी होल्डिंग्ज आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड १ द्वारे ऑफर फॉर सेल (OFS) इश्यू होता.

टाटा टेक्नॉलॉजीज ही एक मॅन्युफॅक्चरिंग केंद्रित अभियांत्रिकी संशोधन आणि विकास कंपनी आहे, जी प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह उद्योगावर केंद्रित आहे. या IPO नंतर टाटा टेकमधील टाटा मोटर्सची हिस्सेदारी ६४.७९ टक्क्यांवरून ५३.३९ टक्क्यांपर्यंत खाली येईल.

टाटा टेक्नॉलॉजीजने पहिल्या पब्लिक इश्यूसाठी ४७५-५०० रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला होता. जवळपास २० वर्षानंतर टाटा समुहातील (Tata Group) कंपनीचा आलेला हा पहिला आयपीओ (IPO) आहे.

Back to top button