shubhangi pawar
shubhangi pawar

सातारा : हिरकणी रायडर शुभांगी पवार हिचा अपघाती मृत्यू

Published on

हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय ३२) हिचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे ही दुर्घटना घडली. टँकर डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाली.

सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि.१० ऑक्टोबर रोजी बाहेर पडल्या. १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी त्या मोटारसायकलने निघाल्या होत्या. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर येथे पोहचल्या. पुढे आई तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले.

त्यानंतर पुढे माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी ते सर्वजण जात होते. त्यावेळी भोकर फाटा दाभड येथे शुभांगी यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी जागीच ठार झाल्या.

shubhangi pawar
shubhangi pawar

दरम्यान, घटनेची माहिती 'दैनिक पुढारी'चे वृत्तसंपादक हरिष पाटणे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांना दिली. त्यांनी हिरकणी रायडर्सना मदत करण्याची विनंती केली. त्यांनी तातडीने सूत्र हलवत यंत्रणेला सूचना दिल्या. अपघातानंतर शवविच्छेदन करण्यासाठी अर्धापूर (जि. नांदेड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने साताऱ्यात हळहळ व्यक्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news