पुणे : सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक, मतदान सुरू | पुढारी

पुणे : सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक, मतदान सुरू

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मंगळवारी (दि.१२) रोजी मतदान प्रकिया पार पडत आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरुवात झाली आहे. काही भागात कार्यकर्ते मतदारांपर्यंत जावून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणत आहेत. यावेळी मतदान केंद्रावर सर्वत्र कडक सुरक्षितता ठेवली आहे.

सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी त्यांच्या वाणेवाडी येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी मुरुम येथे तर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी निंबूत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

पावसाची शक्यता असल्याने सभासदांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी सकाळी ७ ते ९ या वेळेत ७.९० टक्के मतदान झाले होते.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : हलगीच्या ठेक्यावर ताल धरायला लावते ज्योती | महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत विशेष मुलाखत

Back to top button