पिठोरी सिरसगाव येथे सहा वर्षाच्या मुलाचा गल्हाटी नदीत पडून मृत्यू | पुढारी

पिठोरी सिरसगाव येथे सहा वर्षाच्या मुलाचा गल्हाटी नदीत पडून मृत्यू

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : आईसोबत नदीकाठी गेलेल्या पिठोरी सिरसगाव येथील ६ वर्षीय बालकाचा गल्हाटी नदीत पाया घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १२ ऑक्टोबर) रोजी उघडकीस आली.

आदित्य बालाजी सांगळे (वय ६) असे बालकाचे नाव आहे. गल्हाटी नदीत आदित्यचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता १ किलोमीटरवर सापडला.

अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील ६ वर्षीय आदित्य हा आपल्या आईसोबत सोमवारी (दि. ११) रोजी दुपारी २ वाजता गल्हाटी नदीवर धुणे धुण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी पोहत असताना तो पाय घसरून गल्हाटी नदीत पडला. हे आदित्यच्या आईच्या लक्षात आले नाही.

यानंतर आदित्यची आई नदीवर कपडे धुवून दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी परतली. यानंतर तिने आदित्यला घरात आणि शेजाऱ्याकडे शोधाशोध सुरू केली.

नदीवर धुणे धुण्यासाठी आईसोबत गेला होता

याच दरम्यान तिला असे वाटले की, आदित्य नदीवर धुणे धुण्यासाठी सोबत आला असावा यावरून तिने नदी काठसह परिसरात नातेवाईकांनी शोधकार्य सुरू केले. परंतु, रात्री अंधार झाला तरी आदित्य कोठेही सापडला नाही. नातेवाईकांना अंधारामुळे त्याला शोधणे कठीण झाले होते.

मंगळवारी (दि. १२ ऑक्टोबर) रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ व नातेवाईकांनी शोध घेतला असता आदित्यचा मृतदेह १ किलोमीटर अतंरावर सापडला. यानंतर त्याला पाण्यातून वर काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आदित्य हा पहिलीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या कुटूंबात एक मोठा भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. घरातील एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने गावात मोठी शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button