जयंत पाटील : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीचा प्रयत्न | पुढारी

जयंत पाटील : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीचा प्रयत्न

धुळे; पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची कोणतीही शक्यता नाही. पण येत्या सहा महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात तिन्ही पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज साक्री येथे दिली.

साक्री येथे ठेलारी व धनगर समाजाच्या मेळाव्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आगमन झाले होते. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. धनगढ व धनगर या शब्दांमुळे आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकार हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. साक्री भागातील धनगर व ठेलारी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी सुचवले होते. त्यामुळे पक्षाच्या आदेशाने या मेळाव्यातून समस्या जाणून घेऊन सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन | ‘वैष्णवी मातृका’ रूपातील पूजा …

Back to top button