Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पीएम मोदींकडून २ लाखांची मदत जाहीर

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पीएम मोदींकडून २ लाखांची मदत जाहीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्य़ात आज (दि.१५) सकाळी झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या : 

वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला टेमो ट्रॅव्हलरने पाठीमागून दिलेल्या धडकेत १२ जण जागीच ठार झाले. तर १८ जण जखमी झाले आहेत. मृतात ५ पुरुष ६ महिला व एका बालकाचा समावेश आहे. ट्रॅव्हलमधील नाशिकचे भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाणा येथे गेले होते. दर्शन करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातातील मृतांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. "अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपये दिले जातील, तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news