Samruddhi Expressway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला टेम्‍पोची धडक, १२ जण ठार | पुढारी

Samruddhi Expressway accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ट्रकला टेम्‍पोची धडक, १२ जण ठार

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्‍तसेवा उभ्या ट्रकला टेमो ट्रॅव्हलरने पाठीमागून दिलेल्या धडकेत 12 जण जागीच ठार झाले. 18 जण जखमी झाले आहेत. मृतात 5 पुरुष 6 महिला व एक बालकाचा समावेश आहे. ट्रॅव्हलमधील नाशिकचे भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाणा येथे गेले होते. दर्शन करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात समृद्धी महामार्गावरील ही घटना घडली.

Back to top button