बिहारमध्ये रेल्वे अपघातात 4 ठार | पुढारी

बिहारमध्ये रेल्वे अपघातात 4 ठार

पाटणा; वृत्तसंस्था : बिहारमधल्या बक्सर भागात नॉर्थ इस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत.

टुरीगंजे ते रघुनाथपूरदरम्यान हा अपघात झाला. या ठिकाणी आता मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. 80 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना पाटणा येथील आयजीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी चालली होती. या ट्रेनचे 20 डबे रुळावरून घसरले आहेत. ज्या ठिकाणी रेल्वेचे डबे घसरले तिथे मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 23 डब्यांची ही ट्रेन सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी दिल्लीतल्या आनंद विहार टर्मिनलहून रवाना झाली होती.

Back to top button