Pune News : पालखी महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ | पुढारी

Pune News : पालखी महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील दौंडज खिंड ते निरा (ता. पुरंदर) दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे नुकतेच बुजविण्यात आले. मात्र, पालखी महामार्गाच्या नवीन जोडरस्त्यावरील अनेक जीवघेणे खड्डे संबंधित ठेकेदाराने बुजवले नाहीत. त्याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. मात्र, याच नवीन रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातात वाढ होत आहे. नागरिकांच्या मागणीनंतर खड्डे बुजविण्यात आले. परंतु, त्याचे काम निकृष्ट पध्दतीने केल्याने पुन्हा ‘जैसे थे’ची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना तसेच प्रवाशांना त्रास होत आहे.

पालखी महामार्गावरील जेजुरी औद्योगिक क्षेत्र ते निरादरम्यान सतत अपघात होत आहेत. मागील काही दिवसांपासून पालखीमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागण्याची चिन्हे आहेत. दौंडज खिंड ते निरा या दरम्यानचा प्रवास जीवघेणा झाला आहे. जुन्या रस्त्याबरोबरच नवीन रस्त्यावर तसेच जोड रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
नवरात्रोत्सवात पुढील दोन दिवसांत सुरू होत आहे. तसेच पुढील काळात दसरा, दिवाळी सण आहेत. या काळात महामागार्वरील वर्दळ वाढण्याची शक्यता असल्याने जीवघेणे खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. पालखी महामार्गावरून जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील कामगार जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. अनेकदा, रात्री खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पालखी महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी पिसुटीर्चे माजी सरपंच अशोक बरकडे यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button