आता लक्ष ‘गगनयान’ मोहिमेकडे | पुढारी

आता लक्ष ‘गगनयान’ मोहिमेकडे

- चंद्रभूषण, ज्येष्ठ विश्लेषक

नवीन वर्षाच्या प्रारंभी पहिल्या पत्रकार परिषदेत ‘इस्रो’ने 2024 मध्ये विक्रमी 12 अंतराळ मोहिमा आखणार असल्याचे जाहीर केले आहे; मात्र सर्वांचे लक्ष 2025 रोजी लाँच होणार्‍या गगनयान मोहिमेकडे असणार आहे. त्यासंदर्भातील विविध पैलूंसाठी नियुक्त केलेल्या समित्या काम करत आहेत आणि त्यांच्या चाचण्या यावर्षी करायच्या आहेत. या चाचण्यांना मिळणारे यश भविष्यातील आशा पल्लवित करणारे असणार आहे.

‘इस्रो’समोर आतापर्यंत प्रामुख्याने प्रक्षेपक तंत्रज्ञान आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित आव्हाने होती. कोणत्याही वस्तूला रॉकेटच्या मदतीने दूरवर नेणे आणि तेथे इलेक्ट्रॉनिक संकेतांच्या आधारे योग्यरीत्या नियंत्रित करणे आणि त्याचवेळी आपल्या मनासारखे काम करून घेणे ही बाब सोपी नाही. गेल्या पाव दशकांत उपग्रहांना कक्षेत स्थापन करण्याबरोबरच चांद्रयानाला चंद्रावर उतरवणे आणि तेथे पृष्ठभागावर त्याला चालवणे हे सर्व काम या दोन प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या श्रेणीत येतात; मात्र यापुढची आव्हाने अतिशय वेगळी राहणार आहेत. ‘इस्रो’ने मानवी अंतराळ मोहिमेला ‘गगनयान’ नाव दिले आहे. आपल्यासाठी किमान अमेरिका आणि रशियापेक्षा कमी आणि चीनच्या तुलनेत ही मोहीम अधिक कठीण राहू शकते. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी मानवी अंतराळ मोहिमेत 1961 मध्येच यश मिळवले. रशियाने 12 एप्रिल 1961 रोजी युरी गागरिन यांना पृथ्वीच्या कक्षेत पाठविले आणि 108 मिनिटे पृथ्वीला यशस्वीपणे प्रदक्षिणा घातल्यानंतर सुखरूप पृथ्वीवर आणले. त्यानंतर 23 दिवसांनी अमेरिकेनेदेखील अशाच प्रकारच्या मोहिमेत यश मिळवले. त्यांचे अंतराळवीर अ‍ॅलन शेपर्ड हे 5 मे 1961 रोजी पंधरा मिनिटांसाठी अंतराळात गेले आणि सुखरूप परतले.

चीनलाही 15 ऑक्टोबर 2003 मध्ये अशा प्रकारचे यश मिळाले. अंतराळवीर यांग लीवेई हे शेनझोऊ-5 यानातून पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले आणि त्यांनी 21 तासांत पृथ्वीला 14 प्रदक्षिणा घालून पॅराशूटच्या मदतीने मंगोलियाच्या वाळवंटात दाखल झाले. या अभियानामुळे चीनच्या संशोधनाच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले; परंतु त्याला रशिया आणि अमेरिकेच्या अनुभवाचा फायदा मिळाला, हे सत्य नाकारता येत नाही. सार्वजनिकरीत्या उपलब्ध अंतराळ विज्ञानाच्या दस्तावेजाच्या आधारे चीनने मोहीम आखली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेनझोऊ-5चे ह्यूमन कॅप्सूल हे बर्‍याच अंशी रशियाचे यशस्वी यान सोयूझच्या रचनेसारखेच होते. चीन शास्त्रज्ञांनी सोयूझच्या रचनेत निश्चितच बदल केला आणि त्यात सुधारणा केली; मात्र त्यात काही प्रमाणात रशियाची भूमिका ही ब्लू प्रिंटच्या रूपातून सहकार्याची राहिली आहे किंवा पुढेही राहू शकते. रशियाचे चीनला लाभलेले सहकार्य कदाचित भारताच्या गगनयान निर्मितीच्या वेळी मिळेलच असे नाही.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्‍यानंतर ‘इस्रो’ने तत्काळ अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आर्टेमिस प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आजही अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध तणावाचे असून ते पाहता भारताने रशियाकडून मदतीची अपेक्षा ठेवणे चुकीचे राहू शकते. दुसरीकडे आर्टेमिसमध्ये सामील झाल्याने जे काही निष्कर्ष बाहेर येतील त्याचा थेट संबंध चंद्राशी असेल. तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीत अमेरिकेचा आडमुठेपणा एवढा प्रचलित आहे की, गगनयानाचा विषय त्यांच्यासमोर मांडणे निरर्थकच आहे. या वर्षाच्या प्रारंभी पहिल्या पत्रकार परिषदेत ‘इस्रो’ने 2024 मध्ये विक्रमी 12 अंतराळ मोहिमा आखणार असल्याचे जाहीर केले; मात्र सर्वांचे लक्ष 2025 रोजी लाँच होणार्‍या गगनयानाकडे असणार आहे. त्यासंदर्भातील विविध पैलूंसाठी नियुक्त केलेल्या समित्या काम करत आहेत आणि त्यांच्या चाचण्या यावर्षी करायच्या आहेत.

इतिहासातील या मोहिमांतील अडचणींचा विचार केला, तर मानवाला घेऊन जाणार्‍या अंतराळयानाचे उड्डाण होण्यापूर्वी शरीरावर होणार्‍या संभाव्य परिणाचे आकलन करण्यासाठी 1957 मध्ये रस्त्यावरची लईका नामक मादी श्वानाला ह्यूमन कॅप्सूलमध्ये बसविण्यात आले होते. अनेक प्राण्यांची चाचपणी झाल्यानंतर लईकाची निवड करण्यात आली. भटकंती करणार्‍या श्वानांत विपरीत परिस्थितीत जिवंत राहण्याची क्षमता अधिक असते. तसेच मादी असल्याने तिच्या चमकदार केसांमुळे तिचा सक्रियपणा हा अधोरेखित करण्यात आला. अंतराळात गेल्यानंतर लईकावर अनेक बालकथा आणि गीत लिहिले गेले. पुढे काय झाले, सर्वकाही गोलमालच. लाँचिंगचा झटका लईकाने सहन केला; मात्र पाच तास 104 डिग्री फॅरेनहाईटचे (40 अंश सेल्सिअस) तापमान ती सहन करू शकली नाही. तिचे मृत शरीर पृथ्वीवर परतले. कोणताही मानवेतर जीव अवकाशात पाठविण्याचा कोणताही अजेंडा चीनची स्पेस एजन्सीकडे (सीएनएसए) नव्हता आणि ‘इस्रो’च्याही नाही. मानवी शरीरावर त्याचा परिणाम होण्यासंदर्भातील डेटा अगोदरपासूनच उपलब्ध आहे. त्यामुळे या आकड्याचे अकलन करण्यासाठी एका रोबोची सेवा मात्र निश्चित घेतली जाणार आहे. अर्थात, सर्वाधिक भर आजही सुरक्षितरीत्या इजेक्शन तंत्रज्ञानाचा विकास करण्यावर आहे. लाँचपॅडवर यानात स्फोट झाल्यानंतर अंतराळवीरांचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना यापूर्वी अमेरिका आणि रशियात घडल्या आहेत. मानवाला घेऊन जाणार्‍या यानासाठी स्फोटक इंधनाचे किती प्रमाण लागते, याचे अकलन करता गगनयानासाठी शक्तिशाली इंजेक्शन सिस्टीम असणे गरजेचे आहे. यानुसार अंतराळवीरांना एका मोठ्या धक्क्यासह पापणी लवण्याच्या आत अवकाशात घेऊन जाईल, अशी सिस्टीम उभारावी लागेल. त्यामुळे अशा अडचणींवर विश्वासार्ह तोडगा ‘इस्रो’ यंदा शोधून काढेल, अशी आशा आहे आणि एकार्थाने 2025 मध्ये जग गगनयानाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे साक्षीदार ठरेल.

Back to top button