

मद्यधुंद महिलेने पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा (ता.जुन्नर जि.पुणे) येथे भररस्त्यामध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गजबजलेल्या पुणे नाशिक महामार्गावर चौकापासून हाकेच्या अंतरावर महिलेने अक्षरशः धिंगाणा घातला.
रस्त्यावर झोपून तिने नाशिककडे जाणारी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आळेफाटा येथील एका हॉटेल व्यावसायिक महिलेने मद्यधुंद महिलेच्या तोंडावर पाणी मारून बऱ्याच वेळ तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. रस्त्यावर झोपून तिने नाशिककडे जाणारी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे बऱ्याच वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही नेमकी कोण महिला आहे, याबाबतदेखील अद्याप माहिती समोर आलेली नाही. महामार्गावर महिलेने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली.