munmun dhamecha mumbai cruise party : मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले ड्रग्स, धक्कादायक video समोर | पुढारी

munmun dhamecha mumbai cruise party : मुनमुन धमेचाने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले ड्रग्स, धक्कादायक video समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क

मागच्या आठवड्यात एनसीबीकडून मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापा टाकला. यामध्ये शहारूख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य सेलेब्रिटी सापडल्याने देशभरात या घटनेची चर्चा झाली. दरम्यान दिवसेंदिवस या केसमध्ये नवीन काही घडताना दिसत आहे. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा ही सोबत होती. त्यानांही एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (munmun dhamecha mumbai cruise party)

एनसीबीच्या चौकशी दरम्यान आरबाज खानच्या शूजमध्ये ड्रग्स सापडले तर मुनमुन धमेच्याने सॅनिटरी पॅडचा वापर करत क्रूझवर ड्रग्स नेल्याचे समोर आले आहे. दरम्यान याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ट्वीटर हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. क्रूझवरील मुनमुन धमेचाच्या रूममधून ड्रग्ज सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका अधिकाऱ्याने सॅनिटरी पॅड रुममधील कार्पेटवर ठेवून त्यातून ड्रगची गोळी बाहेर काढताना दिसत आहे.

munmun dhamecha mumbai cruise party : कोण आहे मुनमुन धमेचा?

मुनमुन एक मॉडल आहे. ती ३९ वर्षांची आहे. ‘एनसीबी’ने ३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता तिला अटक केली होती. ही मूळची मध्य प्रदेशमधील आहेत.

सागर जिल्ह्यातील तिचे वडील उद्योजक होते. त्‍यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

मुनमुन धामेचा हिच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तिचा भाऊ प्रिन्स धमेचा हा दिल्‍लीत वास्‍तव्‍याला आहे.

मुनमुनने आपले शालेय शिक्षण सागर जिल्ह्यात पूर्ण केले. सागर जिल्ह्यात फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे.

कारण मागील काही वर्ष ती आपल्‍या भावासोबत दिल्लीत आणि त्याआधी भोपाळमध्ये राहिली आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, विकी कौशल आणि अन्‍य अभिनेत्‍यांना फॉलो करते.

मुनमुनच्या वकिलांनी तिच्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले पण…

मुनमुनच्या वकिलांनी तिच्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान मुनमुन त्या खोलीत जाण्याआधी काही जण तिथे होते. यावेळी एनसीबीचे अधिकारी आले, त्यांनी त्या खोलीतील कार्पेटवर पडलेले ड्रग मुनमुनचे असल्याचे सांगत तिला अटक केल्याचा आरोप केला.

या व्हिडीओद्वारे असेच दिसत आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये मुनमुन दिसत नाही.

याचबरोरबर अधिकाऱ्यांचा चेहराही दिसत नाही. यामुळे हा व्हिडीओ क्रूझ रेव्ह पार्टीतील आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मात्र, पोस्ट केलेल्या व्यक्तीकडून असे सांगण्यात आले आहे. हा व्हिडीओ त्या क्रुझमधील आहे.

Back to top button