पुण्यातील पावसाचा उपमुख्यमंत्र्याना दणका, अजित पवार अडकले वाहतुक कोंडीत | पुढारी

पुण्यातील पावसाचा उपमुख्यमंत्र्याना दणका, अजित पवार अडकले वाहतुक कोंडीत

पुणे ; पांडुरंग सांडभोर

पुण्यातील लोहगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बसला आहे. रात्री साडे आठ वाजता लोहगाव विमानतळावरून भोसलेनगर येथील निवासस्थानाकडे निघालेले पवार गेल्या एका तासाहून वाहतूक कोंडीत अडकले असून आता नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात अडकले आहेत.

सायंकाळी सहा सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा आणि नगररोड पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे रूप आले आहे. त्यामुळे या भागातील नगर रस्त्यासह विमानतळ, लोहगाव धानोरी या रस्तावरील वाहतूक गेल्या तीन तांसापासून ठप्प आहे. या वाहतूक कोंडीत उपमुख्यमंत्री पवारही अडकले आहेत. रात्री आठच्या सुमारास पवार औरंगाबाद येथून पुणे विमानतळावर उतरले. तेथून ते भोसले नगर येथील निवासस्थानी निघाले, मात्र गेल्या एका तासापासून ते वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. या भागातील सर्वच रस्त्यावर पाणी साठले असल्याने रस्ते जाम आहेत, त्यामुळे पर्यायी मार्ग नसल्याने पवारांच्या वाहनांचा ताफा ही अडकून पडला आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास पवार हे नगर रस्त्यावरील शास्त्री चौक परिसरात अडकले असलयाचे सांगण्यात आले.

Back to top button