अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पुन्हा समन्स, प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहणार का? | पुढारी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पुन्हा समन्स, प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहणार का?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांना पुन्हा एकदा एकदा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. त्यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची तयारी देशमुख यांनी दर्शवली असल्याचे समजते. 

वाचा : मुंबईत खारे पाणी होणार गोड! इस्त्रायलनं केलं खास मराठीत ट्विट, मुख्यमंत्री ठाकरेंचे मानले आभार

ईडीने देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवास्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर लगेच त्यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहायकांस (पीए) ईडीने अटक केली होती. संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे अशी त्यांची नावे आहेत. तर आता अनिल देशमुख यांची चौकशी होणार असून त्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. याआधीही देशमुख यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, देशमुख यांनी मुदत मागून घेतली होती. आता त्यांना ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. यामुळे आज ते चौकशीसाठी हजर राहतील का? याकडे लक्ष लागले आहे.

वाचा : नारायण राणे म्हणाले, ‘हा वाघ सर्कशीतला अन् याचा रिंगमास्टर वेगळाच!’

वाझे प्रकरणात देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटचे आरोप केला होता. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुली करण्याचे गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सीबीआयने तपास सुरू केला. तपासाअंती सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीनेही याप्रकरणात उडी घेऊन तपास सुरु केला आहे.

 

Back to top button