PM kisan सन्मान योजनेचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच

pm kisan
pm kisan
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून PM kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये जमा करत आहे. मोदी सरकारने यावर्षी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ८ हप्ते जमा केले आहेत. दरम्यान, PM kisan सन्मान योजनेचा नववा हप्ता सरकार देण्याच्या तयारीत आहे.

याबाबतचे संकेत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात १० ऑगस्टपासून पीएम किसान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ही रक्कम जमा करत असताना शेतकऱ्यांना याची माहिती देतात. पीएम मोदी यांच्याद्वारे ही घोषणा होणार आहे.

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम…

पीएम किसानच्या ९ व्या हप्त्यासाठी २ हजार रूपयांंची लवकरच प्रतीक्षा संपणार आहे. १० ऑगस्टपर्यंत ११.५ कोटीहून अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ आतापर्यंत मिळाला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा रुपये पाठवते. जेणेकरून ते सहजपणे शेती करू शकतील.

पीएम किसान योजनेच्या नियमानुसार सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर, दहा हजार रुपये पेन्शन मिळणारे सेवानिवृत्त कर्मचारी खासदार, आमदार हे या योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत देशातील 11 कोटी 82 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी, अशी मागणी केली आहे.

हे ही पाहा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news