Suicide Forest : या जंगलात लोक आत्महत्या का करतात? जाणून घ्या रहस्य!

या जंगलात लोक आत्महत्या का करतात? जाणून घ्या रहस्य!
या जंगलात लोक आत्महत्या का करतात? जाणून घ्या रहस्य!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लक्षपूर्वक ऐका! आपली मुलं, कुटुंब आणि जीवनाबद्दल विचार करा. कारण, तुमचा जीव आई-वडिलांकडून मिळालेली अमूल्य भेट आहे', हे सावधानतेचं आणि घाबरविणारं वाक्य जपानच्या ऑकिगहरा जंगलामध्ये प्रवेश करताना एका बोर्डवर लिहिलं आहे. याच जंगलाला 'आत्महत्येचं जंगल' (Suicide Forest) म्हणून जगात ओळखलं जातं.

यापूर्वी या जंगलाबद्दल तुम्ही ऐकलं नसेल, तर तुमच्या माहितीकरिता सांगतो की, हे सुंदर दिसणारं हे हिरवंगार आणि मनमोहक जंगल माॅर्निंग वाॅकसाठी नाही, तर भयानक, अंगावर शहारे आणण्याऱ्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. जगात दुसऱ्या क्रमांकावर हे जपानचं आत्महत्येचं (पहिल्या क्रमांकावर गोल्डन गेट आहे) जंगल आहे. जिथं सध्या ऑलिंम्पिक सुरू असलेल्या टोकियोपासून केवळ २ तासांच्या अंतरावर हे भयानक जंगल आहे.

आत्महत्येच्या जंगलाचं लोकेशन कुठंय?

प्रसिद्ध आत्महत्येचं जंगल (Suicide Forest) माऊंट फूजी नाॅर्थवेस्टमध्ये आहे. ३५ स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे भयानक जंगल पसरलेलं आहे. हे जंगल इतकं घनदाट आहे की, त्याला झाडांचा समुद्र असंही म्हंटलं जातं. या जंगलात एखाद्या व्यक्तीचं हरवणं सामान्य गोष्ट आहे. इथून बाहेर पडणंच खूप अवघड आहे.

जंगलाबद्दल कथा काय सांगतात?

जपानमधील पौराणिक कथेनुसार या जंगलामध्ये आत्म्यांचा वास आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २००३ पर्यंत १०५ डेडबाॅडीज सापडलेल्या आहेत. त्यामधील बहुतेक बाॅडीज पूर्णतः सडलेल्या होत्या. काही बाॅडीज तर, जंगलातील प्राण्यांनी अर्धवट अवस्थेत खाल्लेल्या होत्या. जपानमधील धर्मगुरू असं सांगतात की, इथं मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यामुळे या जंगलात भितीदायक घटना घडतात.

या जंगलात एकदा गेलं की, तिथं फोन, मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञानातील कोणतीच वस्तू चालत नाही. आपल्या हातातील फोनवर डायरेक्शन चुकीचं दाखवतं, त्यामुळे माणूस भटकतो. मोबाईलमधला सिग्नल गायबच होतो. याचं कारण आहे की, या जंगलातील मातीमध्ये मॅग्नेट आयर्नचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या जंगलात एकदा गेलं की, बाहेर पडणं जास्त मुश्किल आहे.

तेथील लोकं म्हणतात की, जी लोकं या जंगलात आत्महत्या करतात, त्यांचं शरीर इथंच पडता कामा नये. जंगलात काम करणारे कर्मचारी हा बाॅडीज पोलिस ठाण्यात नेतात. लोकं असंही सांगतात की, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीसाठी ही चांगली गोष्ट नाही. कारण, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा आत्मा रात्रभर ओरडत असतो. इथं ३०० वर्षांपूर्वीची झाडं आहेत.

जंगलात फिरण्याची अशी आहे ट्रिक

असं सगळं असलं तरी, हे जंगल खरंच पहाण्यासारखं आहे. हिरवंगार असं हे जंगल हायकर्स आणि एडव्हेंचरसाठी खूप महत्वाचं आहे. मोठ्या प्रमाणात ते तिथं पोहचतात. पण, कुणी एकटा व्यक्ती हे जंगल फिरण्यालाठी जात नाही. समुहाने ते तिथं फिरण्यासाठी जातात. या जंगलात फिरण्यासाठी एक ट्रिक वापरली जाते. काय करतात? तर, फिरणाऱ्या व्यक्तीचा समुह सोबत प्लॅस्टिकचा टेप किंवा रिबन घेतात. रस्ता लक्षात राहावा, यासाठी सोबत आणलेली प्लॅस्टिकची टेप रस्त्यांवरील झाडांवर चिकटवत जातात.

या इंटरेस्टिंग स्टोरीज वाचल्यात का?

पहा व्हिडीओ : सह्याद्रीतील हिरव्या बेडक्याची अनोखी गोष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news