PCMC Standing Committee: महापालिका भवनात अजितदादा पवार, लक्ष्मण जगताप यांची तैलचित्रे; स्थायी समितीची मंजुरी

अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्रालाही उमेद मान्यता; 730 नवीन खुर्च्या, पालखी मार्ग टॉयलेट व इतर खर्चांनाही हिरवा कंदील
PCMC Standing Committee
PCMC Standing CommitteePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या दर्शनी भागात तळमजल्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तैलचित्र झळकणार आहे. तसेच, भाजपाचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचेही तैलचित्र लावले जाणार आहे. उमेद मान्यतेवर महापालिका भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. त्यासह विविध कामांच्या खर्चाला स्थायी समितीने बुधवार (दि. २२) मान्यता दिली आहे.

PCMC Standing Committee
PCMC DP Plan Hearing: पिंपरी-चिंचवड डीपी प्लानवर 56 हजार हरकती; 3 ऑगस्टपासून सुनावणी, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह 6 महिने बंद

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचेही तैलचित्र महापालिकेच्या दर्शनी भागात लावण्यास सर्वसाधारण सभेने १३ मार्च २०२६ ला मंजुरी दिली आहे. तर, महापौर रवी लांडगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याची विनंती १८ मे २०२६ च्या पत्राद्वारे केली आहे. त्याला अद्याप सर्वसाधारण सभेची मान्यता नाही. उमेद मान्यतेवर अहिल्यादेवी होळकर यांच्यासह अजित पवार व लक्ष्मण जगताप यांच्या तैलचित्र तयार करण्याच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. एका तैलचित्रासाठी ४ लाख २५ हजार रुपये खर्च आहे. महापालिकेच्या दर्शनी भागात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावले आहे. ते तैलचित्र काढणारे चित्रकार सुनील शेगावकर यांनाच ते काम थेट पद्धतीने देण्यात आले आहे.

PCMC Standing Committee
Pimple Gurav Municipal School: पिंपळे गुरवच्या महापालिका शाळा क्र. ५४ मध्ये पालकांसाठी शेडची प्रतीक्षा; पावसात उभे राहण्याची वेळ

महापालिकेच्या ८५ प्राथमिक शाळा इमारतींमध्ये मुख्याध्यापकांचे मदतनीस म्हणून ७० सफाई सेवक व एक निवासी रखवालदार नेमलेला आहे. त्यांच्या १५ महिन्यांच्या वेतनासाठी २ कोटी ६६ लाख १ हजार ८१० रुपये खर्च आहे. दुर्गा टेकडीच्या ५० वर्षांचा इतिहास या पुस्तकाच्या १०० प्रती खरेदीस ७ लाख ३५ हजार रुपये खर्च आहे. आरोग्य विभागाच्या कचरा वाहतूक करणार्‍या वाहनांवर व्हीटीएम यंत्रणा बसविण्याच्या कामास दुसरी मुदतवाढ देण्यात आली असून, त्याला २५ लाख ४५ हजार रुपये खर्च आहे. यासह विविध कामांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पुन्हा १८ लाखांच्या ७३० खुर्च्यांची खरेदी

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विविध विभागांसाठी तब्बल १ हजार १२७ खुर्च्यांची खरेदी करण्यात आली. मध्यवर्ती भांडार विभागाने सांगवी येथील इंद्रनिल टेक्नॉलॉजीज पुरवठादाराकडून ८ हजार ५२५ रुपये दराने एकूण ९६ लाख ३५ हजार ८५० रुपये खर्चास स्थायी समितीने मार्च महिन्यातील सभेत मंजुरी दिली होती. पुन्हा ७३० खुर्च्यांच्या खरेदीस समितीने मंजुरी दिली आहे. मुंबईतील विमप्लेट लिमिटेडकडून २ हजार ४१७ रुपये ८१ पैसे दराने त्यावर एकूण १७ लाख ६५ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

PCMC Standing Committee
Pimple Gurav Vegetable Market: स्मार्ट सिटी झाली, पण भाजी मंडईचा प्रश्न कायम; पिंपळे गुरवमध्ये वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

गोडाऊन चौक ते वाकड चौक मेट्रो डीपीआरचा प्रस्ताव तहकूब

पुणे-नाशिक महामार्ग ते मुंबई-बंगळूर महामार्गास जोडणार्‍या बीआरटीएस मार्गावर (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रॉन्झिट सिस्टीम) इलेक्ट्रिक मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. पुणे-नाशिक महामार्ग ते मुंबई बंगळूर महामार्गास जोडणार्‍या भोसरीतील गोडाऊन चौक, नाशिक महामार्ग, कुदळवाडी चौक, ऑटो क्लस्टर, काळेवाडी फाटा चौक, जगताप डेअरी चौक, वाकड चौक या बीआरटीएस मार्गावर मेट्रो मार्गाचे नियोजन करण्यात आले आहेत. त्याचा डीपीआर तयार करण्यास ८५ लाख ४१ हजार ९८५ रुपये खर्च असून, तो प्रस्ताव समितीने तहकूब केला आहे.

पालखी मार्गावरील २ हजार ३०८ पोर्टेबल टॉयलेटवर दीड कोटीचा खर्च

जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गावर व मुक्काच्या ठिकाणी पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिदिन प्रतिपोर्टेबल टॉयलेटसाठी १ हजार ६४५ रुपये दर होता. त्यानुसार, एकूण १ कोटी ५१ लाख ८७ हजार रुपये खर्चास समितीने मंजुरी दिली आहे.

PCMC Standing Committee
Chakan Moshi Traffic Jam: चाकण-मोशी औद्योगिक पट्ट्यात खासगी बसांचा मनमानी थांबा; रोजच्या वाहतूककोंडीने नागरिक हैराण

रावेतमधील सेक्टर ३२ येथे स्मशानभूमी विकसित करणार

रावेत येथील सेक्टर क्रमांक ३२ येथे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आराखड्यातील स्मशानभूमीचे आरक्षण महापालिका विकसित करणार आहे. त्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती केली होती. मात्र, परिसरातील सोसायटीधारकांनी त्याला हरकत घेतली. ते प्रकरण राष्ट्रीय हरित लवादात गेले. लवादाने दिलेल्या आदेशानुसार नीरी संस्थेमार्फत प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. ते काम त्याच आर्किटेक्टला थेट पद्धतीने देण्यात आले आहे. त्या एजन्सीला एकूण निविदा रकमेच्या १. ९० टक्के शुल्क दिले जाणार आहे. त्यास समितीने मान्यता दिली आहे

पालिकेकडून अजितदादांना अभिवादन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त महापौर रवी लांडगे व आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी आयुष्यमान भारत योजनेचे राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल, जितेंद्र ननावरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, डॉ. वैशाली घोडेकर, मनीषा लांडे, वर्षा जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, माजी नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे तसेच, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news