Chakan Moshi Traffic Jam: चाकण-मोशी औद्योगिक पट्ट्यात खासगी बसांचा मनमानी थांबा; रोजच्या वाहतूककोंडीने नागरिक हैराण

कंपन्यांच्या बस रस्त्यावरच थांबल्याने सकाळ-संध्याकाळ मोठी कोंडी; पार्किंग झोन, पिकअप पॉइंटच्या अभावामुळे अपघाताचा धोकाही वाढला
Chakan Moshi Traffic Jam
Chakan Moshi Traffic JamPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरातील चाकण, मोशी, निघोज, कुरळी, आळंदी रस्ता या औद्योगिक पट्ट्यांमध्ये दररोज सकाळ, संध्याकाळी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. परिसरातील हजारो कंपन्यांमध्ये लाखों कामगार कार्यरत आहेत. या कामागारांची ने-आण करण्यासाठी कंपन्यांकडून बससुविधा दिली जाते, परंतु, बसचा रस्त्यावरील थांबा, चुकीच्या ठिकाणी पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे या भागातील नागरिक, प्रवासी आणि इतर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Chakan Moshi Traffic Jam
Pimpri Chinchwad RBSK Health Checkup: पिंपरी-चिंचवडमध्ये १.५७ लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; १,३७६ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

मुख्य रस्त्यांवर ताबा

या औद्याेगिक परिसरात सकाळी साडेसहा ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते साडेसात या वेळेत येथील रस्त्यांवर खासगी बसेसचा अक्षरश: ताबा असतो. कंपन्यांच्या बसेस कामगारांना घेण्यासाठी प्रत्येक चौकात वळणावर आणि मुख्य रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे मागे वाहनांची रांग लागते आणि वाहतूक ठप्प होते. अनेकदा किरकोळ अपघातांची शक्यता निर्माण होते. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले तरी बसचालकांकडून नियमांचे पालन होत नाही.

अपघाताचा धोका

चाकण, आळंदी रस्ता, मोशी- आळंदी रस्ता, मोशी-आळंदी रस्ता, निघोज- कुरळी रस्ता, एमआयडीसीतील आतंरिक रस्ते या ठिकाणी दररोज शकडो बस उभ्या राहतात. काही बसचालक कामगारांची वाट पाहण्यासाठी रस्त्याच्याकडेला चुकीच्या पध्दतीने बस थांबतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर मोठी कोंडी होते. अनेकदा कामगार बसमध्ये चढण्यासाठी घाईत रस्ता ओलांडतात आणि त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. शाळकरी मुलांच्या बस, मालवाहू गाड्या आणि दुचाकीचालक यामुळे निर्माण होणाऱ्या गर्दीतून वाट काढणे अत्यंत अवघड बनले आहे.

Chakan Moshi Traffic Jam
Pimpri Chinchwad Wet Waste Rules: पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्टनंतर मोठ्या सोसायट्यांचा ओला कचरा महापालिका उचलणार नाही; नियम मोडल्यास दंड आणि फौजदारी कारवाई

वाहनांच्या रांगा

चाकण, तळवेड, निघोजे, कुरुळी या परिसरात कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या हजारो बस दररोज रस्त्यावर येतात. अनेक कंपन्यांचे २५ ते ३० कर्मचारी एकच ठिकाणांहून बसमध्ये चढतात. त्यामुळे ही बस जवळपास पाच मिनिटे रस्त्यावर उभी राहते. त्यामुळे बसच्या मागे वाहनांच्या रांगा लागतात. सरासरी प्रत्येक बस एक मिनिट ते पाच मिनिटांचा हॉल्ट रस्त्यावर घेते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

पार्किंग झोन, पिकअप पॉइंटही नाहीत

कामगारांना घेण्यासाठी रस्त्यावर बस उभ्या केल्याने वाहतूककोंडी होतेच; पण या बसला कंपन्यांमध्येही पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे या बस कंपनीच्या बाहेर रस्त्यावरच पार्किंग केल्या जातात. एमआयडीसी परिसरात या बससाठी कोणत्याही प्रकारचे पार्किंग झोन नाही. तसेच, पोलिसांनी या बसचालकांना पिकअप पॉइंटही ठरवून दिलेले नाहीत.

Chakan Moshi Traffic Jam
Pimpri Chinchwad Development Works: पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांवर कोट्यवधींचा खर्च; तरीही वारंवार डागडुजी, नागरिकांचा संताप

मला व्यवसायनिमित्त दररोज खेड व पुणे प्रवास करावा लागतो. मात्र चाकण, मोशी परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तासनतास कोंडीत अडकावे लागत आहे. या परिसरात खासगी बस जागा मिळेल तशा उभ्या केला जातात. या कामागारांना घेण्यासाठी- नेण्यासाठी या बसगाड्या थांबलेल्या असतात. वाहतूक पोलिसांनी त्यांना पिकॲप पॉइंट ठरवून दिले तर वाहतूककोंडी निर्माण हाेणार नाही.

कमल कुदनाने व्यावसायिक

महिला कामगारासाठी अंतर्गत मार्गांवर पीएमपीच्या बसेस चालू करा, अशी मागणी पीएमपी प्रशासनाकडे केली होती. ही मागणी पूर्ण झाली, तर खासगी कंपन्याच्या बस अशा कोठे ही थांबणार नाहीत. ती मागणी मान्य झाली असून, काही अंतर्गत मार्गावर पीएमपीच्या बस सुरू आहेत. त्यामुळे खासगी बसचालकांच्या मनमानी थांब्याला आळा बसण्यास मदत होणार आहे.

संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना

Chakan Moshi Traffic Jam
Pawna Dam Water Storage: लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला! पवना धरण 86% भरले; मागील वर्षाची सरासरीही पार

सर्व कामगारांना कंपनींकडून थांबे ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे थांब्यावर बस थांबते. उशीर झाला तर मागून येणाऱ्या वाहनांनी जावे लागते. मात्र, जर गाडी बंद झाल्या तर खासगी बसचा लाभ घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आमचा खर्च वाढणार आहे.

श्रुती जाधव कामगार

खासगी बसचालकांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांची चढ-उतार करताना वाहतुकीस अडथळ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी; तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त , वाहतूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news