Black Crab Price: चिंचवडच्या बाजारात काळ्या खेकड्यांची धूम; जम्बो खेकड्यांचा भाव १२०० रुपये किलो!

मावळ-मुळशीतून मोठ्या प्रमाणात आवक; खेकड्यांच्या झणझणीत रस्स्यासाठी खवय्यांची बाजारात गर्दी
Black Crab
Black CrabPudhari
Published on: 
Updated on: 

चिंचवड: मावळ, मुळशी तालुक्यातून बाजारात रसरशीत काळे खेकड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पावसाळ्यानंतर तसेच हिवाळ्याच्या सुरुवातीला खेकड्यांना खवय्यांकडून विशेष पसंती दिली जाते. या मोसमातील पहिल्याच ताज्या खेकड्यांचा आस्वाद घेण्यासाठी चिंचवड, डांगे चौक, वाकड आणि पिंपरी येथील मुख्य मासळी बाजारात खवय्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी करत आहेत.

Black Crab
Modi Script Reader: मावळच्या अभिमन्यू शिंदेंची शासनाच्या ६३ सदस्यांच्या यादीत निवड; कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी

मोठ्या आकारांचे खेकडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सकाळी विक्रीसाठी आलेला माल काही तासांतच संपत आहे, अशी माहिती स्थानिक मासळी विक्रेत्यांनी दिली. मावळ आणि मुळशी डोंगरदऱ्यांमधून कातकरी बांधवांकडून पारंपरिक पद्धतीने पकडले जाणारे हे 'काळे खेकडे' चवीला अत्यंत उत्कृष्ट मानले जातात. पावसाळ्यानंतर आणि हिवाळीच्या सुरुवातीच्या वातावरणात खेकड्यांचे सूप आणि रस्सा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. त्यामुळे खेकड्यांचा झणझणीत रस्सा आणि सुपला विशेष मागणी असल्याने पिंपरी चिंचवडमधील हॉटेल्स, ढाबे आणि खानावळीचे मालक पहाटेच थेट बाजारात पोचून घाऊक दराने खेकडे खरेदी करत आहेत.

Black Crab
Pimpri Tree Conservation: पिंपरीत ‘झाडे वाचवा’चा संदेश भिंतीवरच; झाडांच्या मुळाशी ड्रेनेजच्या झाकणांचा खच!

खेकडा हा अनेक खाद्यप्रेमींचा आवडीचा पदार्थ असून त्यापासून विविध प्रकारचे रुचकर पदार्थ तयार केले जातात. खेकड्यांचे कालवण, मसाला, रस्सा तसेच इतर पारंपरिक पदार्थांना खवय्यांकडून विशेष पसंती मिळते. त्यामुळे बाजारात खेकडे उपलब्ध झाल्यानंतर त्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक असतात. खेकडे पकडणे त्यांची बाजारपेठेत विक्रीसाठी आणणे आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवणे या प्रक्रियेत विक्रेत्यांची महत्त्वाची भूमिका असते. बाजारात खेकड्यांची आवक किती आहे, त्याचा आकार कसा आहे आणि ग्राहकांची मागणी किती आहे, यावर विक्रीचे प्रमाण अवलंबून असते.

Black Crab
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीच्या बाजारात मटार स्वस्त; १५० रुपयांवरून थेट ८० रुपयांवर, पपनसाचीही एन्ट्री!

मोठ्या खेकड्यांना पसंती

बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले काळ्या रंगाचे खेकडे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान मोठ्या आकारातील खेकड्यांची विक्री केली जाते. बाजारात २०० ते ३०० ग्रॅमच्या लहान खेकड्यांचे सहा नग ५५० रुपयांना मिळत आहेत तर ७०० ते ८०० ग्रामच्या चांगल्या भरलेल्या मोठ्या जम्बो काळ्या खेकड्यांचे भाव ११०० ते १२०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचवले आहेत. काळ्या पाठीच्या खेकड्यांची चव वेगळीच असल्याने ग्राहक चढ्या दराने ही खरेदी करत आहेत. हा व्यवसाय कातकरी कुटुंबासाठी मुख्य उपजीविकेचा आधार ठरत आहे. ग्राहक खेकड्यांचा आकार, ताजेपणा आणि दर्जा पाहून खरेदी करताना दिसतात. काही ग्राहक घरगुती जेवणासाठी तर काही जग खास पाहुण्यांच्या जीवनासाठी खेकड्यांची खरेदी करतात.

समुद्रातील व खाडीतील प्रकार

सध्या बाजारात नदीतील गोड्या पाण्यातील खेकडे (उदा. काळ्या पाठीची खेकडे) गाडीचे मड क्रॅबस आणि समुद्रातील खेकड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. खेकड्यांचा आकार आणि त्यामधील मांसाच्या प्रमाणावर प्रति जोडी ७० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत (लहान - मध्यम) आणि मोठ्या जंबो किंवा निर्यातीच्या दर्जाच्या खेकड्याचे भाव ५०० रुपयांपासून ते १२०० रुपये पर्यंत प्रति किलो पर्यंत चालू आहे.

Black Crab
Body Worn Cameras: वाहतूक पोलिसांचे कामकाज आता ‘ऑन कॅमेरा’; पिंपरी-चिंचवड पोलिसांना ३५० बॉडी वॉर्न कॅमेरे

सध्या बाजारात काळ्या खेकड्यांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. खेकडे खरेदी करण्यासाठी नियमित ग्राहक बाजारात येतात. खेकड्यांचा आकार, उपलब्धता आणि ताजेपणा यानुसार त्यांची विक्री होते. खेकड्यांची मागणी असल्यामुळे ग्राहकांच्या आवडीनुसार खेकडे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

दीपक भोई, मासे विक्रेते

खेकड्यांचे कालवण आणि मसाला हे आमच्या आवडीचे पदार्थ आहेत. बाजारात चांगल्या दर्जाचे आणि ताजी खेकडे मिळाले की आम्ही आवर्जून खरेदी करतो.

स्वप्निल बोरसे, ग्राहक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.