Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीच्या बाजारात मटार स्वस्त; १५० रुपयांवरून थेट ८० रुपयांवर, पपनसाचीही एन्ट्री!

आवळे-बोरांची आवक सुरू; लिंबू आणि मिरचीचे दरही उतरले, लसूण मात्र २०० रुपये किलोवर
Vegetable
VegetablePudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. १५) मटारचा हंगाम सुरु झाल्याने आवक सुरु झाली आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. मटार १५० रुपये प्रतिकिलो वरून ७० - ८० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तसेच मिरची आणि लिंबाचे दर देखील उतरले आहेत. मिरची ५० रुपये, तर लिंबू २०० रुपये वरून वरून ६० - ८० रुपये किलो विक्री केली जात आहे. तर काकडीचे दर काहीसे वाढले आहेत. दिवाळीच्या सुट्यांमुळे नागरिक गावी गेल्याने रविवारी भाजीमंडईमध्ये कमी वर्दळ होती. बाजारात लसणाच्या दरात अजून वाढच असून १८० - २०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Vegetable
Body Worn Cameras: वाहतूक पोलिसांचे कामकाज आता ‘ऑन कॅमेरा’; पिंपरी-चिंचवड पोलिसांना ३५० बॉडी वॉर्न कॅमेरे

कांद्याचे दर तेजीतच होते. लिंबाची आवक वाढल्याने लिंबू ६० - ८० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांदे ५० - ६० रुपये, गाजर ४० - ५० रुपये, बीट ४० रुपये, मटार ८० रुपये, बीन्स ६० रुपये, राजमा ७०, वांगी ६०, गवार ६० - ८० रुपये, शेवगा ६० - ८० रुपये, दोडका ६० - ७० रुपये, कोबी ३० रुपये, फ्लॉवर ५० रुपये, काकडी ५०, टोमॅटो २० रुपये, शिमला ४० - ५० रुपये, मिरची ५० - ६० रुपये, तोंडली ५० - ६० रुपये, बटाटा २५ ते ३० रुपये तोंडली ५० - ६० रुपये असे दर आहेत.

Vegetable
Pimpri Chinchwad Diwali Garbage: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या सात दिवसांत ९,६९५ टन कचरा जमा

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (प्रतिकिलो रुपयांत)

रविवारी बाजारात गवार ८० रुपये किलो, गावरान गवार १००, शेवगा ८०, रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. टोमॅटो २०, भेंडी ५०, फ्लॉवर ६०, कोबी ३०, मिरची ४०, गाजर ३०, शिमला ६०, लसूण २००, आले १५०, वांगी ५० रुपये, काकडी ५० रुपये, कारले ४०, कांदे ५० - ६० किलो, बटाटा २५ - ३० रुपये किलो, बिन्स ७० रुपये किलो, पावटा ८०, लाल भोपळा २० रुपये, घोसाळी ४०, दोडका ७० रुपये, तोंडली ६० रुपये, बीट ४० रुपये, दुधी ४०.

पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर २५ रुपये, मेथी २०, पालक २०, शेपू २०, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २५, चवळई १५, लाल माठ ३०, करडई १५, कांदापात २०, करडई १५, आळू पाने २० रुपये जुडी, आंबट चुका २०, अंबाडी १५ रुपये.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा ९० रुपये, मटार ८०, गावरान गवार १००, गवार ७० रुपये, पावटा ८० , तोंडली ६० रुपये, बीट ५० , दोडका ६०, कारली ६०, भरताची वांगी ५०, भेंडी ७० रुपये, मिरची ६०, फ्लॉवर ५०, कोबी ४० , वांगी ५० , घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ३०, पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९० रुपये, मद्रास काकडी ६० रुपये, आरबी ८० रुपये किलो, सिमला ६० रुपये, राजमा १००, बिन्स ७०, गाजर ५० रुपये किलो, रताळी ५० रुपये, टोमॅटो २५ रुपये .

Vegetable
Pimpri Chinchwad Nominated Corporators: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा मुहूर्त कधी? भाजपचे ७, राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक ठरणार

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा ३०, बटाटा १२, लसूण १००, आले ५० , भेंडी ३०, गवार ७०, टोमॅटो ८, वाटाणा ६०, घेवडा ६०, दोडका ४०, हिरवी मिरची ४०, दुधी भोपळा २५, काकडी ४०, कारली २५, गाजर २५, फ्लॉवर ३०, कोबी २०, ढोबळी ४०, वांगी २०, शेवगा ५०, घोसाळी ३०, लिंबू ६०, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४८४०, पालेभाजी ५८३०० (गड्डी), फळे आवक ६३८, कांदा ६३३, बटाटा १०२९, लसूण १०, आले ८०, भेंडी ८९, गवार १५, टोमॅटो ७२५, वाटाणा १५६, घेवडा ५४, दोडका ७, हिरवी मिरची १७४, दुधी भोपळा ३९, काकडी १८७, कारली ६३, डांगर १०२, गाजर १२५, फ्लॉवर ४७४, कोबी ३३३, वांगी १०३, ढोबळी ११९, बीट २८, शेवगा ४७, लिंबू ४८, मका कणीस ५८ तोंडली १२, रताळी ७ क्विंटल इतकी आवक झाली.

आवळे, बोरांची आवक

थंडी सुरू होताच फळबाजारात हिवाळी फळांची चाहूल लागली आहे. बाजारात ताजे आवळे आणि बोरांची आवक झाली आहे. आवळे १०० रुपये, तर बोते ८० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. गेल्या आठवड्यापर्यंत बाजारात प्रामुख्याने केळी, सफरचंद, डाळिंब, पपई दिसत होती. आता आवळे आणि बोरांच्या टोपल्या बाजारात मांडल्या गेल्या आहेत. हिरवेगार आवळे आणि लाल-तपकिरी बोरे पाहूनच ग्राहक थांबून भाव विचारत आहेत.

Vegetable
Lonavala Hawkers Protest: लोणावळ्यात टपरीधारकांच्या कारवाईविरोधात सर्वपक्षीय आंदोलन; पुनर्वसनानंतरच कारवाईची मागणी

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे

सफरचंद १६० - २०० रुपये, मोसंबी १०० - १५०, संत्री १५० - १८०, डाळिंब १५० - २००, पेरू ५० - १००, पपई ४० - ५०, केळी ५० रुपये डझन, अननस ८० - १०० प्रतिनग, पिअर १२० रूपये, ड्रॅगनफ्रुट १०० रुपये, किवी २५०, नाशपती १०० रुपये, आलुबुखार १५० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे.

फळबाजारात पपनसची एन्ट्री

पिंपरी-चिंचवडच्या फळबाजारात हिवाळी मोसमातील फळांची आवक सुरू झाली आहे. आवळे, बोरे यांच्यानंतर आता बाजारात पपनस उपलब्ध झाले आहे. मात्र, पपनसाचा भाव ऐकून ग्राहकांना थोडा धक्काच बसत आहे. बाजारात सध्या पपनस २०० ते २५० रुपये नग या भावाने विकला जात आहे. हे फळ कोकणातून येत असल्याने याचे भाव जास्त आहे.पपनस म्हणजे लिंबूवर्गीय फळांमधले सगळ्यात मोठे फळ. एक फळ १ ते २ किलो वजनाचे असते. वरून जाड साल, आतमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या फोडी, चव आंबट-गोड. पपनसची नुकतीच आवक सुरु झाली आहे; मात्र प्रमाण कमी आहे. त्यामुळे नगाला २०० ते २५० रुपये भाव मिळत आहे. पुढच्या आठवड्यात आवक वाढली की भाव थोडा खाली येईल, असं एका फळविक्रेत्याने सांगितलं.

पपनसाचे फायदे

पपनसमध्ये 'क' जीवनसत्व भरपूर असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पचनासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही पपनस चांगला मानला जातो. विक्रेते सांगतात, पपनस घेताना फळ जड वाटलं पाहिजे. हलकं असेल तर आत गर कमी असतो. साल थोडी पिवळसर झालेली असावी. अशा प्रकारचा पपनस चवीला चांगला असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.