Modi Script Reader: मावळच्या अभिमन्यू शिंदेंची शासनाच्या ६३ सदस्यांच्या यादीत निवड; कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी

मोडी लिपी वाचक म्हणून राज्यस्तरीय मोहिमेत सहभाग; जुन्या अभिलेखांचे वाचन आणि कुणबी नोंदींच्या शोधात करणार मदत
Abhimanyu Shinde
Abhimanyu ShindePudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मराठा आरक्षण कक्षामार्फत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील जुन्या अभिलेखांची तपासणी करून कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या राज्यस्तरीय मोहिमेसाठी मावळ तालुक्यातील कामशेत येथील अभिमन्यू प्रकाश शिंदे यांची मोडी लिपी वाचक म्हणून निवड करण्यात आली आहे.

Abhimanyu Shinde
Pimpri Tree Conservation: पिंपरीत ‘झाडे वाचवा’चा संदेश भिंतीवरच; झाडांच्या मुळाशी ड्रेनेजच्या झाकणांचा खच!

महाराष्ट्र शासनाच्या १५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यासाठी अभ्यासक प्रतिनिधी, मोडी लिपी वाचक आणि वंशावळ जुळविणारे तज्ज्ञ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ६३ प्रतिनिधींच्या यादीत अभिमन्यू शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Abhimanyu Shinde
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरीच्या बाजारात मटार स्वस्त; १५० रुपयांवरून थेट ८० रुपयांवर, पपनसाचीही एन्ट्री!

शिंदे यांनी यापूर्वी पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. १० ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुंबई येथे झालेल्या प्रशिक्षणात त्यांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना शासनाचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे.

Abhimanyu Shinde
Body Worn Cameras: वाहतूक पोलिसांचे कामकाज आता ‘ऑन कॅमेरा’; पिंपरी-चिंचवड पोलिसांना ३५० बॉडी वॉर्न कॅमेरे

१२ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेत जुन्या मोडी लिपीतील दस्तऐवजांचे वाचन, महसुली अभिलेखांची तपासणी, कुणबी नोंदींचा शोध आणि वंशावळ जुळविण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व असणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील शासकीय कार्यालये तसेच मुंबई येथील फोर्ट परिसरातील पुराभिलेख संचालनालयात ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.

Abhimanyu Shinde
Pimpri Chinchwad Diwali Garbage: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या सात दिवसांत ९,६९५ टन कचरा जमा

मावळ तालुक्यातील जुन्या महसुली नोंदी आणि ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये महत्त्वपूर्ण माहिती दडलेली असण्याची शक्यता आहे. या नोंदींचे अचूक वाचन, पडताळणी आणि त्यातून कुणबी नोंदींचा शोध घेण्यामध्ये मोडी लिपी वाचकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मावळ तालुक्यासाठी मोडी लिपी वाचक म्हणून मिळालेली जबाबदारी मी अत्यंत गांभीर्याने स्वीकारली आहे. कुणबी नोंदी शोधण्याची ही मोहीम अनेक कुटुंबांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. जुन्या अभिलेखांमधील नोंदींचे अचूक वाचन करून उपलब्ध माहिती समोर आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. कोणतीही पात्र नोंद दुर्लक्षित राहू नये, यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून संबंधित विभागांशी समन्वय साधणार आहे.

अभिमन्यू शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.