सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन ६१० बाधित ९ जणांचा मृत्यू | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन ६१० बाधित ९ जणांचा मृत्यू

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सोमवारी दुपारी 12 वा. पर्यंत कोरोनाचे नवीन 610 रुग्ण सापडले. याच कालावधीत 9 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 102 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 26 हजार 532 झाली आहे. आतापर्यंत 19 हजार 931 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत जिल्ह्यातील 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात सद्यस्थितीत 5 हजार 911सक्रीय रुग्ण आहेत, यातील 372 रुग्णांची स्थिती चिंताजनक असून त्यातील 319 रुग्ण ऑक्सिजनवर तर 53 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक 123 कोरोना बाधित सावंतवाडी तालुक्यात सापडून आले. त्याचबरोबर मालवण 117, कुडाळ 96, वेंगुर्ले 74, देवगड 71, कणकवली 70, वैभववाडी 29, दोडामार्ग 14 व जिल्ह्याबाहेरील 2 असे कोरोना रुग्ण सापडले. सद्यस्थितीत कुडाळ तालुक्यात 1325 असे सर्वाधिक सक्रीय कोरोन बाधित आहेत. त्यापाठोपाठ मालवण 1 हजार 61, सावंतवाडी 925, कणकवली 907, देवगड 730, वेंगुर्ले 430, दोडामार्ग 309, वैभववाडी  203 व जिल्ह्याबाहेरील 31 अशी सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आहे. आतापर्यंत कणकवली तालुक्यात सर्वाधिक 144 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ सावंतवाडी 114, मालवण 108, कुडाळ 99, देवगड 91, वेंगुर्ले 59, वैभववाडी 47, दोडामार्ग 20असा तालुकानिहाय मृतांचे आकडे आहेत.

सोमवारी कोरोनामुळे झालेल्या 9 मृतांमुळे बाव-कुडाळ येथील 65 वर्षीय पुरुष, नेरूर-कुडाळ येथील 72 वर्षीय पुरुष, मसुरे-मालवण येथील 54 वर्षीय पुरुष, डिगस-कुडाळ येथील 65 वर्षीय पुरुष, कलमठ- कणकवली येथील 61 वर्षीय महिला, मालवण येथील 46 वर्षीय पुरुष, बांदा-सावंतवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, हडी-मालवण येथील 83 वर्षीय पुरुष अशा 8 रुग्णांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तळेबाजार देवगड येथील 59 वर्षीय पुरुषाचा एस.एस.पी.एम. रुग्णालय पडवे येथे कोरोनामुळे मृत्यू झाला. 

कोरोनाग्रस्तांसाठी महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ 

कोव्हिड-19 ने ग्रस्त रुग्ण, ज्यांची ऑक्सिजन पातळी 94 टक्के पेक्षा कमी आहे किंवा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे, अशा रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय कोव्हिड रुग्णालये व एस.एस.पी.एम. हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, पडवे तसेच साईलीला हॉस्पिटल नाटळ व संजीवनी रुग्णालय, कणकवली  या तीन खासगी रुग्णालयात या योजनेचा लाभ घेता येईल. कोरोना बाधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

 

Back to top button