आजरा तालुक्यात पावसाची संततधार  | पुढारी | पुढारी

आजरा तालुक्यात पावसाची संततधार  | पुढारी

आजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी तालुक्यात  सरासरी 127.25 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. 

दरम्यान, जोरदार पावसामुळे साळगाव, शेळप बंधारा रात्री उशिरा पाण्याखाली गेला. पावसामुळे मलिग्रे येथील कृष्णा भैरू बुगडे यांच्या गोठ्यांचे पडझड होऊन नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणीपातळीसह विविध पाणी प्रकल्पांच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.आजरा मंडलमध्ये गेल्या चोवीस तासांत 157 मि. मी., मलिग्रे मंडलमध्ये 112 मि.मी., उत्तूर मंडलात 70 मि.मी. अशी एकूण 509 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

बी बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी

पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा खरिपाची कामे आटोपून घेण्यात मग्न झाला आहे. पावसाळी साहित्य खरेदीसह विविध प्रकारची बी बियाणे खते खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसू लागली आहे.

Back to top button